हिमायतनगर| मागील अनेक वर्षांपासून अनेक घरकुल लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नवीन घरकुल प्रस्ताव देण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. नगरपंचायतीने नवीन घरकुलाचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून लाभ मिळवून द्यावा. अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद (First Mayor Abdul Akhil) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


शासनाने प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) (शहरी) 2.0 चालू केलेली असून, नगरपंचायत हिमायतनगर अंतर्गत येणाऱ्या शहरातील वार्ड क्रमांक 01 ते 17 मधील नागरिकांची नवीन घरकुलाचा लाभ मिळणे आवश्यक आहे. अनेक लाभार्थीं नवीन घरकुल मिळणे बाबत मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत. हिमायतनगर नगरपंचायतीकडून प्रस्ताव स्वीकारले जात नसल्याने नागरिक नवीन प्रस्ताव दाखल करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हि बाब लक्षात घेऊन नगरपंचायत कार्यालयामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारून घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाची प्रत नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी, घरकुल बांधकाम विभागाला देखील देण्यात आली असून, यावर अब्दुल अखिल अब्दुल हमीद माजी नगराध्यक्ष नगर पंचायत हिमायतनगर यांची स्वाक्षरी आहे.
