Tuesday, June 30

Tag: Potholes at the Juna Ganj

Potholes : जुना गंज – मनसुरखान हवेली चौरस्त्यावर खड्डेच खड्डे

Potholes : जुना गंज – मनसुरखान हवेली चौरस्त्यावर खड्डेच खड्डे

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जुन्या नांदेड भागातील जुनागंज - मनसुरखान हवेली चौरस्त्यावर खड्डेच खडे पडलेले आहेत. यामुळे वाहन चालकासह नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेश चतुर्थी पुर्वी खड्डे बुजवण्याची मागणी साईनाथ यादव यांनी मनपाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. जुनागंज- मनसुरखान हवेली चौरस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत असुन वाहन चालक जखमी होत आहेत. खड्यामुळे नागरीकही पडत असुन जखमी होत आहेत. याची दखल घेवुन या भागातील खड्डे बजुवण्यात यावे अशी मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे. या भागात सिमेंट रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असुन सिमेंट रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी होत आहे. तसेच ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले नाही. ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण करुनच सिमेंट रस्त्याचे काम करा...
error: Content is protected !!