HomeनांदेडDistrict level peace committee meeting : गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश...

District level peace committee meeting : गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सव निमित्ताने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

नांदेड| गोकुळ अष्टमी, दहीहंडी, पोळा सण, गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 4.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी संधी
शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी संस्थेत जागा रिक्त राहिल्यास 13 ऑगस्ट रोजी अतिरिक्त प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्कासह सकाळी 8 ते 11 यावेळेत माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेत नांदेड येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क 9421871893, 9766809179 वर संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांनी केले आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन
जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगारची संधी उपलब्ध व्हावी यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून कंधार तालुक्यातील कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी येथे करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पासून कंधार कॉलेज ऑफ फार्मसी बाळांतवाडी येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड येथे ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com संर्पक क्र. 02462-251674 योगेश यडपलवार 9860725448 संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments