Cleanliness of Nav Ghat and Saibaba Mandir area ; सिडको मुख्य रोडवरील कचरा व महापुरामुळे नाव घाट व साईबाबा मंदीर परिसराची स्वच्छता – NNL
नवीन नांदेड| गणेशोत्सव निमित्ताने सिडको हडको, रविनगर कौठा परिसरातील मुख्य रस्त्यावर पुजाचे साहित्य विक्री करणाऱ्यानी साहित्य घेऊन गर्दी केली होती व रात्री उशिरापर्यंत विक्री नंतर राहिलेले साहित्य रोडवर ठेवल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा होत असल्याने तात्काळ सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या स्वच्छता विभागाच्या वतीने तात्काळ साफसफाई कर्मचारी, नालेसफाईचे कामगार, महिला पुरुष यांच्या साहाय्याने सफाई करून जवळपास १६ ट्रिप व्दारे कचरा उचलून सफाई केली तर नाव घाट, साईबाबा मंदीर देवस्थान कौठा वसरणी येथील गाळ जेटींग मशिन व जेसीबी मशीन सहाय्याने काढण्यात आला.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव घाट व साईबाबा मंदीर देवस्थान कौठा वसरणी येथील पायरा व भाग गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे पुर्णपणे बुडाल्या नंतर पाणी औसरल्या नंतर गाळ मात्र मोठ्या प्रमाणात राहि...
