CPIM Delegation : अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणी माकपच्या शिष्टमंडळाने घेतली डीआयजी शहाजी उमाप यांची भेट

NNL Team
3 Min Read

नांदेड| सेलू जिल्हा परभणी येथील २४ वर्षीय युवक अनिकेत शेरे हा एक वर्षांपासून बेपत्ता झाला होता. त्याला त्याच्या दोन मित्रांनी तो काम करीत असलेल्या कापड दुकानातून बोलावून नेले होते.

परंतु तो घरी आलाच नाही. अनिकेत चे वडील बळवंत शेरे पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस ठाणे सेलू येथे मिसिंग दाखल केली होती.बेपत्ता मुलाच्या नातेवाईकांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि शेवटी पोलीस ठाण्या समोर धरणे आंदोलन केले. प्रभारी ठाणेदार दिपक बोरसे यांनी जाणीवपूर्वक तपासात हलगर्जीपणा केला व आंदोलन कर्त्या नातेवाईकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. असा आरोप अनिकेतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देखील मिसिंग व तक्रारी अर्ज देण्यात आला होता. परंतु ठोस कार्यवाही झाली नाही. या प्रकरणात आतापर्यंत चार अधिकाऱ्यांनी तपासकामी काम पहिले आहे. शेवटी नव्याने तपास करणारे उप निरीक्षक शेख शाकेर यांनी तपासाची फाईल आंदोलन कर्त्या नातेवाईकांना दिली आणि बेपत्ता असलेला युवक एक वर्षांपूर्वी मयत झाल्याचे निष्पन्न झाले. कारण जी फाईल नातेवाईकांना दाखविली त्या मध्ये अनिकेत हा एक वर्षांपूर्वी मरण पावला असून त्याचा अंत्यविधी पोलीसांनी पोलिसांनी परस्पर उरकून टाकल्याचे सांगण्यात आले.

धरणे आंदोलन व सातत्याने पाठपुरावा तसेच मिसिंग दाखल असताना परस्पर अंत्यविधी का करण्यात आला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकंदरीतच प्रकरण संशयास्पद असून सेलू पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचे पुढे येत आहे.

अनिकेतचे मित्र असलेले दोन आरोपी विरोधात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घडलेला प्रकार गंभीर असल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची २३ फेब्रुवारी रोजी भेट घेऊन सखोल चौकशी करून हयगय करणाऱ्यावर व खून करणाऱ्या आरोपीना पाठीशी घालणाऱ्या सेलू पोलिसांवर कायदेशीर व कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

डीआयजी उमाप यांनी सर्व प्रकरण समजून घेत सेलू ठाणे प्रभारी यांना फोन करून माहिती घेतली व काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.तसेच परभणी पोलीस अधीक्षक यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने एक विस्तृत निवेदन सादर केले आहे.

या शिष्टमंडळात माकपचेराज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभने,कॉ. रामकृष्ण शेरे पाटील, कॉ.देविदास शेरे, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, रामप्रसाद बोराडे, निकिता मिंड, कॉ.जयराज गायकवाड आदींचा समावेश होता. पीडित कुटुंबियांना यथोचित न्याय देण्यात येईल असे श्री उमाप यांनी सांगितले.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!