HomeनांदेडGutkha smuggled under shoe box | ट्रकमधून चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची...

Gutkha smuggled under shoe box | ट्रकमधून चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची तस्करी वसमत शहर परिसरात पोलिसांचा छापा -NNL

पोलिसांनी छापा टाकून ४० लाखांचा मुद्देमाल केला जप्त, चौघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली/नांदेड| हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या वसमत शहरातील बिगारी चौक परिसरात एका ट्रकमधून चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची पोते आणल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी छापा टाकून 10 लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि वाहन असे मिळून 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या वसमत शहरातील बिगारी चौक येथे एका मोठ्या ट्रकमधून गुटखा आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख हकीम, बालाजी मिरासे, प्रशांत मंंुढे, गारोळे, शेख इम्रान, राहूल राठोड यांच्या पथकाने शनिवारी रात्री तपासणी सुरु केली होती.

दरम्यान एका ट्रकमधून काही पोते उतरविले जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने चप्पल-बुट असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता चप्पल बुटाच्या बॉक्स खाली गुटख्याची पोती आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी ट्रक व मुद्देमाल ताब्यात घेऊन वसमत पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली. यामध्ये ट्रकमध्ये राजसी परंम्परा नावाचा ४० पोते गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत १० लाख रुपये असून पोलिसांनी गुटखा व ट्रक असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख हाकिम यांच्या तक्रारीवरून मोहमद नासेर दीन मोहम्मद, मोहम्मद रशीद मोहम्मद इलीयास (रा. अटबर जि. हरियाणा), विकास उर्फ विकी छाबरा (रा. अमरावती), अफसर चाऊस (रा. वसमत) यांच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चालक मोहमद नासेर याची अधिक चौकशी केली असता त्याने सदर ट्रकमध्ये चप्पल बुट असल्याचे सांगून अमरावती मार्गे वसमतकडे पाठविल्याचे सांगितले. वसमत येथे केवळ एक भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता. त्यावर संपर्क साधून पोते देण्याचे सांगण्यात आल्याचे सांगितले. मागील आठवड्यात हिंगोली जिल्हयातील हि दुसरी मोठी कामगिरी असून, यापुर्वी कळमनुरी पोलिसांनी ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments