HomeनांदेडPeople's College : पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक

People’s College : पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन “क” झोन क्रिकेट स्पर्धेत पीपल्स कॉलेजने अंतिम सामन्यात एस.जी. जी.एस. कॉलेजच्या महिला संघाचा पराभव करत विजयाची हॅट्रिक संपादन केली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन “क” झोन क्रिकेट स्पर्धेत पीपल्स कॉलेज आणि एस.जी.जी.एस. कॉलेजचा अंतिम क्रिकेटचा सामना अत्यंत रंगतदार पीपल्स कॉलेजच्या मैदानावर झाला. मार्गदर्शक क्रीडा प्रमुख प्रा. विलास वडजे, मेंटॉर प्रा. विजय कदम व कर्णधार पूजा गलांडे यांच्या नेतृत्वात अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 09 धावांनी एस.जी.जी.एस. कॉलेजचा पराभव करीत अंतर महाविद्यालयीन ” क ” झोन स्पर्धेवर पीपल्स कॉलेजचे नाव कोरले. याचबरोबर सतत 03 वर्षे विजय साकार करीत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. पीपल्स कॉलेज मुलांच्या संघाने नुकतेच विजयाची हॅट्रिक पूर्ण केली होती. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले.

सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सी.ए.(डॉ.) प्रवीण पाटील, सचिव सौ.श्यामल पत्की मॅडम, सहसचिव श्री.प्रफुल अग्रवाल, शालेय समिती अध्यक्ष ॲड.श्री. प्रदीप नागापूरकर व इतर कार्यकारिणी सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, उपप्राचार्य डॉ.अशोक सिद्देवाड, कार्यकारिणी सदस्य डॉ.यशपाल भिंगे, डॉ. डी.एन.मोरे, डॉ. विशाल पतंगे, डॉ. बाजीराव वडवळे, डॉ. सी. के. हरनावळे, डॉ. मिर्झा बेग , डॉ. साजिद,ग्रंथपाल प्रा. संदीप गायकवाड व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विलास वडजे, कार्यालयीन प्रमुख श्री.रोहिदास आडे, क्रीडा सदस्य , प्रा. विजय कदम,डॉ.विनायक देव, डॉ.विनोद चव्हाण, प्रा. किरण बिचकुंदे, श्री नरेश कमट्टम , श्री राहुल गवारे, श्री सय्यद इरफान व सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments