People’s College : पीपल्स कॉलेज महिला संघाची विजयाची हॅट्रिक
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन "क" झोन क्रिकेट स्पर्धेत पीपल्स कॉलेजने अंतिम सामन्यात एस.जी. जी.एस. कॉलेजच्या महिला संघाचा पराभव करत विजयाची हॅट्रिक संपादन केली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन "क" झोन क्रिकेट स्पर्धेत पीपल्स कॉलेज आणि एस.जी.जी.एस. कॉलेजचा अंतिम क्रिकेटचा सामना अत्यंत रंगतदार पीपल्स कॉलेजच्या मैदानावर झाला. मार्गदर्शक क्रीडा प्रमुख प्रा. विलास वडजे, मेंटॉर प्रा. विजय कदम व कर्णधार पूजा गलांडे यांच्या नेतृत्वात अत्यंत अटीतटीच्या सामन्यात 09 धावांनी एस.जी.जी.एस. कॉलेजचा पराभव करीत अंतर महाविद्यालयीन " क " झोन स्पर्धेवर पीपल्स कॉलेजचे नाव कोरले. याचबरोबर सतत 03 वर्षे विजय साकार करीत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. पीपल्स कॉलेज मुलांच्या संघाने नुकतेच विजयाची हॅट्...
