आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

NNL Team
2 Min Read

नांदेड l शास्त्रीय गायन, वादन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या संगीत शंकर दरबारची महाराष्ट्रामध्ये एक आगळी-वेगळी ओळख निर्माण झाली असून उद्या दि. 25 फेब्रुवारीपासून नांदेडकरांना संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.

संगीत शंकर दरबारचे हे 22 वे वर्ष आहे. यशवंत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे दि. 25 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा. अशोकराव चव्हाण हे राहणार असून यावेळी भोकरच्या आ. श्रीजयाताई चव्हाण यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात डॉ.राम बोरगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळयानंतर अनुपमा जोशी यांचे सरोद वादन, रुचिरा केदार व पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद नांदेडकरांना मिळणार आहे.

IMG 20260224 WA0013 आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी

दि. 26 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमास माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार असून यावेळी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्या ॲड.सुजयाताई चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर आदित्य मोडक व अनुराधा कुबेर यांचे शास्त्रीय गायन तसेच डॉ.मैसूर मंजुनाथ व मैसूर नागराज यांची व्हायोलीन जुगलबंदी पहावयास मिळणार आहे.

दि. 27 रोजी सकाळी 6 वाजता कुसुम सभागृहात मंगेश बोरगावकर व संच यांचा माय मराठी,सूर मराठी या कार्यक्रमाचे मराठी दिनानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या संगीत शंकर दरबार सोहळयास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी.पी. सावंत, सह सचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर व कोषाध्यक्ष ॲड.उदय निंबाळकर यांनी केले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!