Thursday, May 14

Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन – NNL

नांदेड l सहयोग नगर येथील गणपती मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या मिनी हॉल च्या कामाचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

IMG 20240916 WA0007 Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन - NNL

आमदार बालाजी कल्याणकर यांनी या कामासाठी आमदार निधी दिला आहे. नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्य्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजपा चे महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड मोतेवार काका, खरवडकर काका,सचिन किसवे,धम्मा कदम, पुष्पा कोकीळ,शिवराज कदम, प्रकाश चोबे,संदीप पाटील,राजू राठोड, विश्वनाथ पाटील,दिपाजीराव शिंदे हे प्रमुख उपस्थित होते.

सहयोग नगर गणपती मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणेश जी यांची आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुजा करून आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते. सहयोग नगर येथील गणपती मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या मिनी हॉलसाठी आ कल्याणकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सहयोगनगर च्या वतीने पंढरीनाथ बोकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!