Digital Farming : कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

नांदेड| कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत सन 2025-26 साठी डिजीटल शेतीशाळा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर डिजीटल शेतीशाळाचे वेळापत्रक प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना स्वत: झुम लिंकवर किंवा पाणी फाउंडेशनच्या युटयुब चॅनलवर लाइव्ह कार्यक्रमास जॉईन होता येईल. तरी शेतकऱ्यांनी या डिजीटल शेतीशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या डिजीटल शेतीशाळेमध्ये दर सोमवारी सायंकाळी 6.15 वा. बाजरी, सायंकाळी 7.30 वा. सोयाबीन, दर मंगळवारी सायंकाळी 6.15 वा. खरीप ज्वारी तसेच सायं.7.30 वा. कापूस, दर बुधवारी सकाळी 10 वा. भात, सायं. 6.15 वा. मका तसेच सायं. 8 वा. पशुधन, दर गुरुवारी सायंकाळी 6.15 वा. राजमा (घेवडा) तसेच सायंकाळी 7.30 वा. आंबा व पेरु, संत्रा, मोसंबी व कागदी लिंबु दर शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा. तुर, मुग व उडिद, दर शनिवारी सायंकाळी 7.30 वा. भाजीपाला या पिकांचे शेतीशाळेमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या डिजीटल शेतीशाळेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी शंका झुमच्या चॅट बॉक्स किंवा युटयुब चा कॅमेट सेक्शनमध्ये लिहावे.

पाणी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने डिजीटल शेतीशाळा राबवित असते. या डिजीटल शेतीशाळेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पाणी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमातून व शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button