नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील रेकॉर्डवरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे आरोपीची योजना तयार करुन आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगांराना स्थानबध्द तसेच हद्दपार करण्यासंबंधाने कार्यवाही चालु आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये 179 प्रस्तावावर हद्दपारीची कार्यवाही चालु आहे. सन 2023 मध्ये 26 टोळ्यामधील 79 इसमांना तसेच सन 2024 मध्ये 06 टोळ्यामधील 22 इसमांना असे एकुण 101 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले आहे. MPDA अंतर्गत 17 सराईत आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे. पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे श्री. सतिष ऊर्फ चिमण्या नायवराव हंबर्डे, वय 22 वर्ष, राहणार विष्णुपुरी, नांदेड याचेवर चोरी करणे, जबरी चोरी, अवैद्यरित्या हत्यार बाळगणे व वापर करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एम. पी.डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे प्राप्त झाला होता.

मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती असल्याने आरोपी नामे सतिष ऊर्फ चिमण्या नायबराव हंबर्डे, वय 22 वर्ष, राहणार विष्णुपुरी, नांदेड यास एक वर्षाकरीता हर्सल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 17 गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 18 झाली आहे.



