HomeनांदेडMud empire on national highway | दारुल उल्लूम ते हिमायतनगर अंतर्गत राष्ट्रीय...

Mud empire on national highway | दारुल उल्लूम ते हिमायतनगर अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर शहपासून ते रेल्वेगेट अंतर्गत रस्त्याचे काम रेल्वे ब्रिज होणार म्हणून थांबून आहे. सदर रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. वाहनधारकांना जिव मुठीत धरून या अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. असून दुचाकी स्वाराचे किरकोळ अपघात रोजचेच झाले आहेत. या ठिकाणी एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वाहनधारक व शेतकरी वर्गातून अर्धवट काम ठेऊन निधी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्र. १६१ या अंतर्गत रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळून जवळपास १० वर्ष उलटून गेली आहेत. भोकर कडून हिमायतनगर दारुल उल्लूम पर्यत सिमेंट रस्ता झाला. रेल्वेगेट जवळ ब्रिज होणार म्हणून रेल्वेगेट ते हिमायतनगर शहरानजीक अंतर्गत रस्त्याचे काम थांबलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अंतर्गत रस्त्यावर मोठ्याप्रमाणात चिखल झाला असून, चिखलातून मार्ग काढून या रस्त्यावरून प्रवाशी ये,जा करीत आहेत. चिखल व खड्डेमय रस्त्यावर घसरगुंडी झाल्याने दुचाकी स्वारासाठी हा अंतर्गत रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. नागपूर स्थितीत भाईजी नामक ठेकेदाराने जाणीवपूर्वक हे काम प्रलंबित ठेवून प्रवाश्यांना त्रास देत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया नागरीकातून व्यक्त होत आहेत.

IMG 20240723 150053 1 Mud empire on national highway | दारुल उल्लूम ते हिमायतनगर अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य - NNL

राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर झालेल्या चिखलातून मार्ग काढताना रोजच किरकोळ अपघात घडत आहेत. या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडू नये, या करीता संभाव्य धोका टळावा. म्हणून या अंतर्गत रस्त्यावर सद्यस्थितीत चुरी अथवा डस्ट अंथरून प्रवाश्यांना दिलासा द्यावा. तसेच रेल्वे ब्रिजचे काम हाती घेण्यात येवून ते वेगाने पुर्ण करावे अशी मागणी शेतकरी, नागरिक, वाहनधारक प्रवाशांकडून केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments