Fartilizers ; खते कुठे उपलब्ध? आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या कृषि विभागाचा अभिनव उपक्रम

नांदेड। नांदेड  जिल्हा परिषदेच्या  कृषि विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक खतांची माहिती घरबसल्या, सहज उपलब्ध व्हावी यासाठी Blogspot या लोकप्रिय आणि सुलभ माध्यमाचा वापर करून खते माहिती प्रणाली सुरू केली असल्‍याची माहिती जिल्‍हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी दिली आहे.
     
नांदेड  जिल्ह्यातील सर्व खत विक्री केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषि विभागाने तयार केलेला हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे.
        
https://adozpnanaded.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html या Blog च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक, यासारखी माहिती सहज मिळते. जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती ही या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन अद्ययावत करण्यात येते. परिणामी शेतकरी खत खरेदीचे अचूक नियोजन करू शकतात आणि गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करू शकतात. ब्लॉकस्पाॅट वापरणे अत्यंत सुलभ आहे. हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत आणि कोणतीही अॅप डाऊनलोड न करता चालते. सदर माहिती संपूर्णपणे पारदर्शक व सार्वजनिक वापरासाठी खुली आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळेत योग्य माहिती मिळू शकते.
     
डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर करून आम्ही शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमामुळे खत खरेदी सुलभहोणार असून, शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचतील असे मत, जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी व्‍यक्‍त केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button