नवीन नांदेड| नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नवीन नांदेड़ सिडको येथील महावीर चौक परिसरातील नटराज गणेश मंदिर येथे शांतता समिती बैठकीत केले.


सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या आईस्क्रीम विक्रेता यांच्या वर व हडको भागात झालेला दुध विक्रेत्यांवर तलवार हल्ला,या घटनेने परिसरात भयभीत वातावरण झाले होते,तात्काळ ग्रामीण पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन माळाकौठा परिसरात हवेत गोळीबार करून तिन आरोपींना तलवारी व चार चाकी वाहनांसह ताब्यात घेतले .


घटनेचा अनुषंगाने 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी नटराज गणेश मंदिर सिडको परिसरात शांतता समीती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नागरिक याना मार्गदर्शन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे,गुन्हेगाराचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ संपर्क साधावा असेही आवाहन केले,यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे,गोपनीय शाखेचे बालाजी दंतापल्ले, सिडको शिवाजी चौक पोलीस चौकीचे अंमलदार रामदिनवार, यांच्या सह परिसरातील नागरिक, व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, युवक उपस्थित होते.


उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत निखिलेश देशमुख यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला,बैठकीचे सुत्रसंचालन ॲड. प्रसेनजित वाघमारे यांनी केले,याबैठकीस आनंद गायकवाड,अरविंद वाठोरे,आनंद पाटणुरकर, संतोष गुंडावार,राजु तारू, सचिन मगिरवार, राजु नगराले,यांच्यी उपस्थिती होती.



