राजकीयनांदेड

former MP Subhash Rao Wankhede : रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडेचा वाढदिवस साजरा -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने हिमायतनगर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी मारोती मंदिरात महाआरती आणि रुग्णांना फळ वाटप करून बाजार केला आहे.

472495274 3569421329868650 4172519849499586718 n former MP Subhash Rao Wankhede : रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडेचा वाढदिवस साजरा -NNL

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी बोरगडी येथील नवसाला पावणाऱ्या मारुती मंदिरात शनिवारी सकाळी महाआरती करून दीर्घ आयुष्याची कामना केली. त्यानंतर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांचा वाढदिवस साजरा केला.

472389326 594111266695883 5775298055690360235 n former MP Subhash Rao Wankhede : रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडेचा वाढदिवस साजरा -NNL

472357031 3569421289868654 8285220875479660419 n former MP Subhash Rao Wankhede : रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडेचा वाढदिवस साजरा -NNL

यावेळी जेष्ठ शिवसैनिक सत्यव्रत ढोले, दशरथ गोसलवाड, वसंत डवरे, प्रकाश जाधव, विकास पाटील देवसरकर, विजय वळसे, संटी कप्पलवाड, राजेश जाधव, राजू पाटील शेलोडेकर, गजानन हरडपकर, फेरोज कुरेशी, रमेश गुड्डेटवार, प्रकाश हंपोलकर, प्रभाकर क्षीरसागर, विकास नरवाडे, काइतवाड वडगावकर, रामदास भडंगे, साहेबराव चव्हाण, सुनील चव्हाण, सावन डाके, गौरव सूर्यवंशी, आदींसह शेकडो शिवसेना पदाधिकारी, जेष्ठ व युवा शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

472574518 3569421409868642 6499025152413571714 n former MP Subhash Rao Wankhede : रुग्णांना फळ वाटप करून माजी खासदार सुभाषराव वानखेडेचा वाढदिवस साजरा -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!