Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chandrakant Lathkar Maharaj ; विष्णुपुरी हभप चंद्रकांत लाठकर महाराज यांच्या किर्तनाने तुकाराम बिजोत्सव साजरा

Chandrakant Lathkar Maharaj ; विष्णुपुरी हभप चंद्रकांत लाठकर महाराज यांच्या किर्तनाने तुकाराम बिजोत्सव साजरा

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l विष्णुपुरी येथे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव हभप चंद्रकांत लाठकर महाराज यांच्या गुलालाचा किर्तनाने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते तर अखंड हरिनाम सप्ताहाची 17 मार्च रोजी सांगता होणार आहे. व धारूमात मंदिर वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संत जगद्गुरू तुकाराम महाराज अमृत महोत्सव सदैह वैकुंठ गमन व श्रीराम कथा सोहळा दि.१० ते १७ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला होता ,१७ मार्च रोजी हभप वैजनाथ महाराज कागदे यांच्या काल्याचे किर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही तिसाव्या वर्षी वर्षी विष्णुपुरी येथे १० ते १७ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह मौजे विष्णुपूरी ता.जि. नांदेड संत जगद्गुरू तुकाराम महाराज त्रिशतोकोतर अमृत महोत्सव सदैह वैकुंठ गमन राम कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सप्ताह मध...
Sayalani Baba Yatra ;  उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सैलानी बाबा यात्रेसाठी भाविक रवाना

Sayalani Baba Yatra ; उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सैलानी बाबा यात्रेसाठी भाविक रवाना

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा महोत्सव यात्रेतील नारळाच्या होळीसाठी उस्माननगर येथील सरकार इस्माईल तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली १२ मार्च बुधवारी रात्री साडेआठ वाजता भाविकांनी भरलेली एसस्टी महामंडळ रवाना झाली. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा महोत्सव यात्रेसाठी भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन निघत असतात. होळीच्या दिवशी येथे नारळाची होळी करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी बाबा यांच्या यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होळी पेटवली जाते. तर भाविक भक्तांची श्रद्धा म्हणून नाराळ, जूने क...
Baba Bageshwar Pandit Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राच्या आवाहनाचा पुनरुच्चार श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे केला

Baba Bageshwar Pandit Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राच्या आवाहनाचा पुनरुच्चार श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे केला

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
'जातीयवाद सोडा, एक हिंदू बना', त्या दिवशी भारत हिंदू राष्ट्र बनेल... जर सर्व हिंदू एकत्र आले तर भारताचे कोणीही विभाजन करू शकणार नाही... औरंगजेब, बाबर महान नाहीत... रघुवीर महान आहेत... महाराष्ट्रातील भिवंडी येथे एक मठ बांधत आहोत... म्हणून आता आम्हीही महाराष्ट्रीय झालो आहोत... महाराष्ट्रातील पिंपळगाव येथील शिव महापुराण कथा मंचावरून बाबा बागेश्वर यांचा मातांना संदेश... हिमायतनगर,अनिल मादसवार| महाराष्ट्र ही संत नामदेवांची भूमी आहे, मुघलांना पराभूत करणारी भूमी आहे... जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत... असे प्रसिद्ध बाबा बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हंटले आहे. ते महाराष्ट्रातील पिंपळगाव येथे आयोजित शिवमहापुराण कथेच्या मंचावरून उपतसंहितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी हिंदू एकतेवर भर दिला आणि हिंदूंना जातीयवाद संपवून एकत्र येण्याचे आवाहन क...
Shiv Sena : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड दक्षिण सचिव पदी महंत सोमभारती महाराज यांची नियुक्ती

Shiv Sena : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड दक्षिण सचिव पदी महंत सोमभारती महाराज यांची नियुक्ती

नांदेड, धार्मिक
नविन नांदेड l शिवसेनेचे संस्थापक मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजयभाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे ओबीसी व्हिजेएनटी प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जाचे बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या हस्ते दि ८ मार्च रोजी नांदेड दक्षिण सचिवपदी महंत सोमभारती महराज यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. महंत सोम भारती महाराज हे विष्णुपुरी येथिल दत्तात्रय मठ संस्थान चे मठाधिश असून ते गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविले असून आजवर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी पक्षाच्या नांदेड दक्षिण सचिव या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ...
P. P. Rajendradasji Maharaj ; महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे – प. पु. राजेंद्रदासजी महाराज

P. P. Rajendradasji Maharaj ; महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे – प. पु. राजेंद्रदासजी महाराज

नांदेड, धार्मिक
नांदेड/भोकर/हदगाव/हिमायतनगर l संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग एका महाराष्ट्रात असून, ही संतमहंतांची भूमी असल्याचे सांगत पिंपळगाव येथील दत्त संस्थान या तीर्थक्षेत्रावर होत असलेली शिवमहापुराण कथा अत्यंत पुण्यदायी आहे. असे अध्यात्मिक विचार शिव महापुराण कथा प्रवक्ते स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्य जी महाराज वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांनी कथा प्रसंगातून बोलताना मांडले. हदगाव तालुक्यातील श्री दत्त संस्थान तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, कथेच्या प्रारंभी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. साधू संत महंत यांची हत्ती, घोडे, पालखी रथातून मिरवणूक काढण्यात आली. भजनी दिंड्या व महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते. ...
Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

Train carrying eight hundred beneficiaries : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील आठशे लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

धार्मिक, नांदेड
नांदेड| मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे भाविकांना घेऊन रवाना झाली आहे. या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले. या रेल्वेला राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. तर रेल्वे स्थानकावर बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती. राज्यातील नागरिकांना देशातील मोठया तीर्थ स्थळांना जावून, मनशांती तसेच आध्यामिक पातळी गाठणे सुकर व्हावे या...
Maha Prasad ; पुणेगाव येथे अखंड दतनाम सप्ताह सांगता,महाप्रसाद आयोजन

Maha Prasad ; पुणेगाव येथे अखंड दतनाम सप्ताह सांगता,महाप्रसाद आयोजन

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l श्री संत सोमगीर महाराज व गुरु बाळगिर महाराज मठ संस्थान पुणेगाव ता. जि. नांदेड द्वारा आयोजित मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशा रोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह व सव्वाखंडी आनंद दत्त महापुजा 6 फेब्रुवारी रोजी गावातुन पालखी मिरवणूक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड दतनाम सप्ताह सवा खंडी महापुजा 27 ते 6 मार्च आयोजित करण्यात आले होते, यामध्ये कार्यक्रम सकाळी 5 ते 6 भुपाळी, सकाळी 7ते 9 पारायण, दुपारी 1 ते 3 ज्ञानप्रकाश बाळक्रिडा पोथी वाचन, सायं. 6 ते 7 आनंद पाठ, सायं. 6 ते 9 महापुजा,रात्री 9 ते 11 किर्तन ठेवण्यात आले होते. यात द.भ.प. शिवाजी महाराज टाकळीकर द.भ.प.श्री महेश महाराज नांदेडकर द.भ.प.श्री रमेश महाराज माऊलीकर द.भ.प.श्री कृष्णा महाराज राजुरकर द.भ.प.श्री संतोषपुरी महाराज चोळाखा द.भ.प.श्री आनंदबन महाराज त...
Ex-MLA Madhavrao Patil : सर्वानी कथेला उपस्थित व्हाव असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

Ex-MLA Madhavrao Patil : सर्वानी कथेला उपस्थित व्हाव असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिह्यातील हदगाव हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पिंपळगाव येथे भव्य सत्संग सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारपासून धार्मिक कार्यक्रमांला सुरुवात होणार आहे. या कथेला सर्वानी उपस्थित व्हाव असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या माध्यमातून केलं आहे. दिनांक ६ मार्चपासून सुरु होणाऱ्या कथा सोहळ्यात सकाळी ७ ते १० या वेळेत विश्वशांती दत्तयाग १०८ कुंडी महायज्ञ होणार असून, दररोज ४३७ दाम्पत्य यज्ञासाठी सात दिवस बसणार आहेत. सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथून हत्ती, उंट, घोडे, ढोलताशे, बँड पथक, भजन, कलश आदिसह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यांनतर दुपारी १२ वाजता भव्य शिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे. कथा मंचावरून श्रीश्रीश्री १००८ अनंत श्रीविभुषित स्वामी राजेंद्रदास महाराज शिवमहापुराण कथा सांगणार आ...
The grand Shiva Mahapuran : पिंपळगाव येथील गुरुवारपासून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाला होणार सुरुवात

The grand Shiva Mahapuran : पिंपळगाव येथील गुरुवारपासून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाला होणार सुरुवात

धार्मिक, नांदेड, मुंबई
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान परीसरात दिनांक ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, या कथा सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण (The grand Shiva Mahapuran story and 108 Kundi Mahayagna will begin from Thursday in Pimpalgaon) झाली आहे. दररोज एक लाख ते सव्वा लाख भाविक येथे येणार असून, त्यांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आमदार बाबुराव कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी परिसराची पाहणी करून सत्संग सोहळा नियोजनाचा आढावा घेतला आहे. भव्य शिवमहापुराण कथा मंचावरून ...
Kaliya Kirtan of Mahashivratri : भव्य शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता

Kaliya Kirtan of Mahashivratri : भव्य शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील आठ दिवसापासुन महाशिवरात्रीच्या निमित्ताने हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिणाम, विना पहारा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. ०३ मार्च रोजी ग्रामदिंडी व हभप. सोपान महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्या संख्येने श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता. ग्रंथराज पारायनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह समाप्ती नीमीत्त दि.०३ मार्च रविवारी सकाळी ९ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य हभप शिवाजी महाराज वडगावकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. या शोभा यात्रेत चिमुकल्या मुलीं डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेऊन बालके सामील झाले होते. तसेच टाळ मृदंगच्या गजरात श्री प...
error: Content is protected !!