हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान परीसरात दिनांक ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, या कथा सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण (The grand Shiva Mahapuran story and 108 Kundi Mahayagna will begin from Thursday in Pimpalgaon) झाली आहे. दररोज एक लाख ते सव्वा लाख भाविक येथे येणार असून, त्यांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आमदार बाबुराव कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी परिसराची पाहणी करून सत्संग सोहळा नियोजनाचा आढावा घेतला आहे.



भव्य शिवमहापुराण कथा मंचावरून श्रीश्रीश्री १००८ अनंत श्रीविभुषित स्वामी राजेंद्रदास महाराज यांच्या मधुर वाणीतून दुपारी १२ ते ४ या वेळात शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे. तसेच १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ सकाळी ७ ते १० या वेळेत होणार असून, दररोज ४३७ जोडपी यज्ञासाठी सात दिवस बसणार आहेत. या कथा कुंभ सोहळ्याला अयोध्या, वृंदावन, ऋषिकेश, जगन्नाथपुरी, बद्रिनाथचे मुख्य पुजारी, ऊज्जैन जगद्गुरू संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील साधुसंत, महंतांच्या विशेष ऊपस्थीती लाभणार आहे. या धार्मिक सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, भाविकांनी कथा व यज्ञात सहभागी होऊन संतांच्या चरण धुळीचे स्नानं करावं असं आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केलं आहे.

या सत्संग सोहळ्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर- प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज, यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते देखील येणार आहेत. कथेसाठी येणाऱ्या महंतासाठी २७ वातानुकूलित भक्त निवास, ५० राजस्थानी खुंट्या, हदगाव, तामसा, भोकर येथे वातानुकूलित सेवा असणारी सुविधा करण्यात आली आहे. १८ एकर जमिनीवर ४०० बाय ७०० आकाराचा कथेचा सभामंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, महाप्रसादसाठी महिला आणि पुरुषांना वेग वेगळी व्यवस्था ४ हेक्टर मध्ये करण्यात आली आहे. उत्सव काळात दुकान लावण्यास बंदी करण्यात आली असून, कॅरी बॅग वापराचा दुष्परिणाम व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुकान बंदीचा ठराव घेण्यात आला आहे.

सत्संग सोहळ्यात दर्राओज सकाळी ४ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री परमरस्य ग्रंथ पारायण अनुष्ठान सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ११ते ४ महापूजा रात्री ८ ते १० कीर्तन होणार आहेत. गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 सकाळी नऊ वाजता दत्त मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे हत्ती,उंट,घोडे, ढोलताशे, बँड पथक, भजन, कलश आदिसह भव्य शोभायात्रा काढण्यात येऊन श्री 108 कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ व कथा सत्संग सोहळ्याची सुरुवात होणार आहे. दररोज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत असेल श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारण सोहळा गोशाळा श्री क्षेत्र पिंपळगाव दिनांक 9 मार्च 2025 सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी संपन्न होईल असेही कळविण्यात आले आहे.

सप्ताहातील किर्तन, सोहळ्यातील भव्य भजनसंध्या दिनांक ६ मार्च २०२५ वार गुरुवार परमपूज्य राधाकृष्णजी महाराज जोधपुर यांची भव्य भजन संध्या होईल. दिनांक ७ मार्च २०२५ शुक्रवार श्री ष. ब्र.१०८ ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज वाई जिल्हा सातारा, दिनांक ८ मार्च २०२५ शनिवार ह. भ. प.विदर्भरत्न रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर आळंदी, दिनांक ९ मार्च २०२५ रविवार ह. भ. प.डॉ. कृष्णा महाराज चौरे पंढरपूर, दिनांक १० मार्च २०२५ सोमवार ह. भ. प. महंत प्रमोद महाराज जगताप बारामती, दिनांक ११ मार्च २०२५ मंगळवार ह. भ. प.एड. जयवंत महाराज बोधले पंढरपूर, दिनांक १२ मार्च २०२५ बुधवार श्री ष. ब्र.१०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, दिनांक १३ मार्च २०२५ गुरूवार आचार्य परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्य जी महाराज मघापुरी जिल्हा अकोला यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या सात दिवसातील भव्य शिव महापुराण कथेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा महंत श्री योगी आदित्यनाथ जी यांची विशेष उपस्थिती राहणार असून त्याचबरोबर वपू स्वामी श्री कृष्ण कृष्ण गुरु शरणानंद जी महाराज रेती, पप्पू गीता मनीषा स्वामी श्री ज्ञानानंद जी महाराज वृंदावन व पु श्री परमहंस प्रज्ञा आनंद जी महाराज जगन्नाथ पुरी पपू श्री राम प्रवेश दासजी महाराज वराह घाट वृंदावन पप्पू श्री पुंडलिक गोस्वामी जी महाराज वृंदावन पप्पू श्री प्रणव आनंद सरस्वती जी महाराज वृंदावन पपू गुरु श्री स्वामी श्री दत्त शरणानंद जी महाराज प्रथमेश पपू श्री स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज आयोध्या पप्पू स्वामी श्री सिद्धनानंद सरस्वती परमार्थ निकेतन ऋषिकेश पप्पू श्री कृष्णानंद जी महाराज वृंदावन पंजाब पपू श्री रामेश्वर दयाजी छोटे सरकार मध्य प्रदेश पप्पू स्वामीजी श्री अवधेशैतन्य ब्रह्मचारी जी महाराज सुरज कुंड पप्पू ह भ प श्री भास्करगिरी महाराज देवगड पप्पू स्वामी श्री पुण्यानंदगिरी महाराज हरिद्वार पप्पू श्री दीनबंधू दास जी महाराज वृंदावन परम पूज्य साध्वी कनकेश्वरी देवीजी श्री मोरवी गुजरात पप्पू स्वामी श्री किशोरदास देऊन महाराज वृंदावन पप्पू श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी बागेश्वर धाम पप्पू मामा स्वामी श्री ईश्वर दाजी महाराज हरिद्वार पप्पू श्री राधाकृष्ण जी महाराज जोधपुर पप्पू महामंडलेश्वर राम गोपाल दाजी महाराज इंदोर यांच्यासह देशातील ५०० ते ५०० साधुसंत पिठाधीश्वर,चारधाम येथील संत महंत साधू आदी याठिकाणी येणार असून सर्वांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती श्री शिव सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य भक्त परिवार व परमपूज्य गोवत्स बालतपस्वी, बालयोगी व्यंकट स्वामी महाराज पिठाधीश्वर श्री दत्त मंदिर संस्थान पिंपळगाव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान रविवारी आणि सोमवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार सुभाषराव वानखडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, सभापती जगदीश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्याधिकारी मीनल करणवाल, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोशीकर, भोकर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण, डॉ. रामेश्वर भाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आकाश राठोड, पाणीपुरवठ्याचे अभियंता सतीश हिरप आदींसह, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यान भेट देऊन परमपूज्य बालयोगी गोवत्स सद्गुरु शिवलिंग व्यंकट स्वामी महाराज यांचे चरण दर्शन घेतले. त्याअगोदर खासदार नागेश पाटील, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील येथे भेट देऊन नियोजनाची पाहणी केली आहे. तसेच कथा मंडप, भांडार ग्रह, पाकशाळा, यज्ञ मंडप, पर्णकुटी व्यवस्था आधी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर परमपूज्य व्यंकट स्वामी महाराजांच्या अध्यक्षतेखाली वरील सर्व पदाधिकारी व अधिकारी यांची कार्यक्रमाच्या नियोजन संबंधात चर्चा केली.