HomeनांदेडPandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - पंढरीनाथ बोकारे -NNL

Pandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – पंढरीनाथ बोकारे -NNL

नांदेड| इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने ने जुना मोंढा नांदेड येथील आर्य हिंदी विद्या मंदिर दत्तक घेतले असून हि शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. इन्नरव्हील क्लब चे हे सामाजिक बांधिलकी जोपासणार कार्य कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केले.

इन्नरव्हील क्लब नांदेड च्या वतीने हॅप्पी स्कूल चा प्रकल्प आर्य हिंदी विद्या मंदिर या शाळेची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोकारे बोलत होते. शाळेच्या संस्थाचालक सौ.सुनिता तेरकर व दिपक कांकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . त्यांचा सत्कार इन्नरव्हिल क्लबच्या अध्यक्षा प्रा.विमल यन्नावार व सचिव प्रा. सोनाली देशमुख यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. इनरव्हिल क्लब ने ही शाळा दत्तक घेवून त्यांना आवश्यक असणारे बाबींची पुर्तता केली.

IMG 20241022 WA0035 Pandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - पंढरीनाथ बोकारे -NNL

या मधे विद्यार्थांना पायातील शूज व पाण्याचे बाॅटल देण्यात आले. तसेच शाळेला लायब्रररी चे कपाट व सोबत बाल साहित्य व इतर महत्वाची अभ्यासू पुस्तके ही दिली. मूलांना जेवण झाल्यानंतर हात धूण्याकरिता वाॅश बेसिन ही दिले. मुलांचे हायजीन साठी सॅनिटायझेशन चे सर्व साहित्य दिले. महत्वाचे म्हणजे मुलांनी फिट रहावे म्हणून त्यांना सर्व खेळाचे साहित्य दिले. शालेय साहित्य देण्यात आले.

IMG 20241022 WA0038 Pandharinath Bokare : इन्नरव्हील क्लबचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - पंढरीनाथ बोकारे -NNL

मुलांना दिवाळी चे फराळ व सोबत एक दिवा देण्यात आले.. इन्नरव्हील क्लब च्या उपाध्यक्षा सौ. मिनाक्षी पाटील व सी एल सी मेनका डेन्झिल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ किर्ती सुस्तरवार यांनी केले.शाळेचे मुख्याध्यापक सरांचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास इनरव्हिल क्लब चे सदस्य डाॅ चिञा पाटील,लता प्रेमचंदानी,सविता नांदेडकर,रत्ना जाजू,निर्मला जाजू,मीना मालीवाल, वंदना मालपाणी,आशा लव्हेकर,सुजाता मैया,डाॅ पुष्पा गायकवाड ,रूची मोनल जिगना ,डाॅ मुग्धा नेहा अंजली चौधरी,डाॅ पल्लवी अनुराधा व शितल उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments