HomeनांदेडKakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची...

Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून श्री परमेश्वर मंदिरातील वारकरी सांप्रदाईक महिला भजनी मंडळाच्या वतीने काकडा आरतीला प्रारंभ करण्यात आला आहे. सकाळच्या रामप्रहरी सडा-सारवान, अभ्यंगस्नान करून काकडा आरतीसाठी महिला मंडळी येत असल्याने प्रत्येकाच्या घरात हरी नामचे स्वर ऐकू येत आहेत. यामुळे शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हरिनामाच्या मंजुळ स्वराची पहाट सर्वांसाठी सुखदायक ठरत आहे.

IMG 20241021 061505 Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

सकाळी ५ वाजता टाळ – मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी देवी देवतांचे दर्शनासाठी गावात गेल्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील शिवपती मंदिर सभागृहात संतोषी माता आणि विठ्ठल रुख्माईच्या मूर्तीसमोर काकडा आरतीला सुरुवात होते. पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेल्या रिती – रिवाजाप्रमाणे काकडा आरती पूर्वी तासभर विविध धार्मिक गीते, भावगीते, गौळण सादर करून काकडा आरती म्हंटली जाते. कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत काकडा आरती नित्यनेमाने केली जात असून, यामध्ये शेकडो महिला सहभागी होत आहेत. घराघरात सुख समृद्धी नांदो, आरोग्य लाभदायी ठरो अशी कामना काकडा आरतीच्या माध्यमातून केली जात असल्याचे महिलांनी सांगितले आहे.

IMG 20241021 062249 Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

वारकरी संप्रदायाच्या महिला मंडळी श्री परमेश्वर, कालीन्का मंदिरात, लाकडोबा मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होत असून, विविध प्रकारची आरती गाऊन ग्रामस्थांना जागृत करीत आहेत. भक्ति गीतांच्या माध्यमातून सुरु होणारी काकडा आरती व शहरातील मुख्य रस्त्यावरून घुमणाऱ्या दिंडीने वाढोणा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. काकडा आरती आणि भजनी दिंडीचा कार्यक्रम जवळपास महिनाभर चालणार असून, गुलाबी थंडीत सकाळी स्नान करून दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी, भक्त व बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काकडा आरती आणि दिंडीचा समारोप कार्तिक पोर्णिमा समाप्तीच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढून भव्य महाप्रसादाने केला जाणार आहे.

IMG 20241021 061329 Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

IMG 20241021 061431 Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

IMG 20241021 061347 Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments