Kakada Aarti : काकडा आरतीसाठी सकाळच्या प्रहरी श्री परमेश्वर मंदिरात होतेय महिलांची गर्दी -NNL
हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून श्री परमेश्वर मंदिरातील वारकरी सांप्रदाईक महिला भजनी मंडळाच्या वतीने काकडा आरतीला प्रारंभ करण्यात आला आहे. सकाळच्या रामप्रहरी सडा-सारवान, अभ्यंगस्नान करून काकडा आरतीसाठी महिला मंडळी येत असल्याने प्रत्येकाच्या घरात हरी नामचे स्वर ऐकू येत आहेत. यामुळे शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हरिनामाच्या मंजुळ स्वराची पहाट सर्वांसाठी सुखदायक ठरत आहे.
सकाळी ५ वाजता टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी देवी देवतांचे दर्शनासाठी गावात गेल्यानंतर श्री परमेश्वर मंदिरातील शिवपती मंदिर सभागृहात संतोषी माता आणि विठ्ठल रुख्माईच्या मूर्तीसमोर काकडा आरतीला सुरुवात होते. पिढ्यान पिढ्यापासून चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे काकडा आरती पूर्वी तासभर विविध धार्मिक गीते, भावगीते, गौळण सादर करून काकडा आरती म्हंटली जाते. कोजागिरी पौर्ण...
