नवीन नांदेड l श्री संत सोमगीर महाराज व गुरु बाळगिर महाराज मठ संस्थान पुणेगाव ता. जि. नांदेड द्वारा आयोजित मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशा रोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह व सव्वाखंडी आनंद दत्त महापुजा 6 फेब्रुवारी रोजी गावातुन पालखी मिरवणूक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.


मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड दतनाम सप्ताह सवा खंडी महापुजा 27 ते 6 मार्च आयोजित करण्यात आले होते, यामध्ये कार्यक्रम सकाळी 5 ते 6 भुपाळी, सकाळी 7ते 9 पारायण, दुपारी 1 ते 3 ज्ञानप्रकाश बाळक्रिडा पोथी वाचन, सायं. 6 ते 7 आनंद पाठ, सायं. 6 ते 9 महापुजा,रात्री 9 ते 11 किर्तन ठेवण्यात आले होते.

यात द.भ.प. शिवाजी महाराज टाकळीकर द.भ.प.श्री महेश महाराज नांदेडकर द.भ.प.श्री रमेश महाराज माऊलीकर द.भ.प.श्री कृष्णा महाराज राजुरकर द.भ.प.श्री संतोषपुरी महाराज चोळाखा द.भ.प.श्री आनंदबन महाराज तुप्पा द.भ.प.श्री गुरु रुद्रगिर महाराज पुणेगाव (किवळा)आनंद दत्त सव्या खंडी महापुजा सायं 6 वाजता गुरुवार, दि.06/03/2025 रोजी पालखी मिरवणुक सकाळी 8 ते 10 वा गावातुन निघेल, तदनंतर भव्य महाप्रसादास सुरुवात होईल.
या विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पुणेगाव ता. जि. नांदेड यांनी केले आहे.
