नांदेड l एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून युनायटेड पद्यशाली संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहीत (शास्त्री) अडकटलवार यांच्या नेतृत्वाखाली दि. 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी (एस.बी.सी.) 2 टक्के स्वतंत्र आरक्षण 2025 च्या सत्रापासून लागू करावे. विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात 10 आश्रम शाळा सुरू कराव्यात. विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के राजकीय आरक्षण लागू करावे.

विद्यार्थीना जात पडताळणी प्रमाणपत्र तत्काळ द्यावे, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजना साठी एस.बी.सी. व केंद्र शासनाच्या योजनासाठी ओ.बी.सी. प्रमाणपत्र द्यावे, विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे, एसबीसी विद्यार्थीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावे, एसबीसी कर्मचार्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती दयावी व विणकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची नियुक्ती करून लवकरात लवकर काम सुरू करावे. यासाठी एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. 5 ते 9 मार्च दरम्यान आंदोलन करण्यात येत आहे.

पुणे येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघम संलग्न महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघम व मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम सर्व प्रौढ युवक व महिला नांदेड जिल्हा व तालुका युनायटेड पद्मशाली संगमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित अडकटलवार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 5 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाशभाऊ मारावार, तुळशीदासजी भुसा,गोविंद कोकुलवार, नागभूषण दुर्गम, प्रभाकर लखपत्रेवार, व्यंकटराव चिलवरवार, शंकरराव कुंटूरकर, दासरवार सर देगलूर.

गजानन वासमवार, विजय गड्डम, किशोर राखेवार, नागेश पुठ्ठा जालनेकर, सुभाषजी बल्लेवार, श्रीनिवास भुसावार, दिलीप मादास, बालाजी निलपत्रेवार, उमेश कोकुलवार, ईश्वर येमूल, महेंद्र दासरवार, डॉ. प्रकाश बोटलावार, राजेश अडकटलवार, सौ. जयश्री पिचकेवार, गणेश भुस्सा, गणेश कोकुलवार, अॅड. नागनाथ बुद्धलवार, सौ. प्रणिताताई वसमतकर, सौ. लक्ष्मी अंकमवार, सौ. प्रगती निलपत्रेवार.
गंगाधर मारावार, प्रभाकर कर्रे, साईनाथ सुरकुटवार, मनोहर कोकुलवार, माधव बेळीकर, शिवदास सुरकुटवार, सत्यजीत टिप्रेसवार, सौ. रेखा जिंदम, शिवराज दासरवार, व्यंकटराव चिलवरवार, श्रीनिवास माडेवार, शिवाजी कोकुलवार, नागेंद्र अलीशेट्टी, विश्वंभर मादसवार, राधेमोहन हिरमलवार, प्रकाश बोगा, गणेश गड्डम यांच्यासह जिल्हाभरातील पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.