Padmashal ; युनायटेड पद्मशाली संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नांदेड l एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून युनायटेड पद्यशाली संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहीत (शास्त्री) अडकटलवार यांच्या नेतृत्वाखाली दि. 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी (एस.बी.सी.) 2 टक्के स्वतंत्र आरक्षण 2025 च्या सत्रापासून लागू करावे. विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात 10 आश्रम शाळा सुरू कराव्यात. विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के राजकीय आरक्षण लागू करावे.
विद्यार्थीना जात पडताळणी प्रमाणपत्र तत्काळ द्यावे, विशेष मागास प्रवर्गाच्या...
