Homeनांदेडअनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

अनु. जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजनाच्या माहितीबाबत विशेष मेळाव्यांचे आयोजन -NNL

नांदेड| कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना  अंतर्गत अनु. जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावर या 6 जून ते 20 जून 2024 या पंधरवड्यात विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून या योजनेअंतर्गत लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झालेले आहे. तरी जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

कृषि विभागामार्फत तालुकास्तरावर आयोजित मेळाव्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान  व प्रधानमंत्री कृषि सिंचन योजने अंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती देण्यात येणार आहे. प्रामुख्याने सामुहिक शेततळे, वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस, 20 एचपीच्या आतील छोटे ट्रॅक्टर, पावर टीलर, प्लास्टिक मल्चींग, हरितगृह, शेडनेट हाऊस, शितगृह, रायपनिंग चेंबर इत्यादी घटकांची तसेच ठीबक व तुषार सिंचनबाबत माहिती देण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments