Maha Prasad ; पुणेगाव येथे अखंड दतनाम सप्ताह सांगता,महाप्रसाद आयोजन
नवीन नांदेड l श्री संत सोमगीर महाराज व गुरु बाळगिर महाराज मठ संस्थान पुणेगाव ता. जि. नांदेड द्वारा आयोजित मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशा रोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह व सव्वाखंडी आनंद दत्त महापुजा 6 फेब्रुवारी रोजी गावातुन पालखी मिरवणूक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.
मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड दतनाम सप्ताह सवा खंडी महापुजा 27 ते 6 मार्च आयोजित करण्यात आले होते, यामध्ये कार्यक्रम सकाळी 5 ते 6 भुपाळी, सकाळी 7ते 9 पारायण, दुपारी 1 ते 3 ज्ञानप्रकाश बाळक्रिडा पोथी वाचन, सायं. 6 ते 7 आनंद पाठ, सायं. 6 ते 9 महापुजा,रात्री 9 ते 11 किर्तन ठेवण्यात आले होते.
यात द.भ.प. शिवाजी महाराज टाकळीकर द.भ.प.श्री महेश महाराज नांदेडकर द.भ.प.श्री रमेश महाराज माऊलीकर द.भ.प.श्री कृष्णा महाराज राजुरकर द.भ.प.श्री संतोषपुरी महाराज चोळाखा द.भ.प.श्री आनंदबन महाराज त...
