नांदेड/भोकर/हदगाव/हिमायतनगर l संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग एका महाराष्ट्रात असून, ही संतमहंतांची भूमी असल्याचे सांगत पिंपळगाव येथील दत्त संस्थान या तीर्थक्षेत्रावर होत असलेली शिवमहापुराण कथा अत्यंत पुण्यदायी आहे. असे अध्यात्मिक विचार शिव महापुराण कथा प्रवक्ते स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्य जी महाराज वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांनी कथा प्रसंगातून बोलताना मांडले.


हदगाव तालुक्यातील श्री दत्त संस्थान तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, कथेच्या प्रारंभी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. साधू संत महंत यांची हत्ती, घोडे, पालखी रथातून मिरवणूक काढण्यात आली. भजनी दिंड्या व महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते.

तीन दिवस कथेला झाले आहेत. कथेत बोलताना स्वामी राजेंद्र दास महाराज म्हणाले प्रयागराज येथील कुंभ संपल्यानंतर पिंपळगाव मध्ये ज्ञान यज्ञाचा कुंभ भरला आहे. देवाधिदेव महादेव असून शिव कथा श्रवणाने मानवाचे जीवन धन्य होते. शिवमहात्म्य श्रवणाने श्रद्धा निर्माण होते श्रद्धेने विश्वास वाढतो. स्कंद पुराण पद्मपुराण, शिव महापुराण, यामध्ये भक्तीचा महिमा वर्णिल्या गेला आहे. धर्माचे मूळ सदाचार आहे सदाचार जीवनात नसेल तर देहाला दुष्परिणाम भोगावे लागतात. आचार हीन व्यक्तीला वेद ही पवित्र करू शकत नाही. त्यासाठी जिथे कुठे कथा सुरु असते त्या ठिकाणी शिवमहापुराण ऐकल्याने विवेकचा विकास होतो.

शिवमहापूरण कथा पूर्ण करण्यासाठी ९, ७, ५, दिवस लागतात. मानवाने जर वेळ नसेल तर कमित कमी ४८ ,२४, १२,किंवा कमित कमी ६ मिनिट तरी शिवपुराण कथा ऐकावी एवढा वेळ जरी कथा ऐकली तरी जीवनाचे सार्थक झाल्या शिवाय राहत नाही असे प्रतिपादन यावेळेस कथाकर श्री राजेंद्रदास जी महाराज यांनी केले. या शिव महापुराणात एकूण २४००० श्लोक आहेत तर ७ संगीताय आहेत. ही कथा प्रेतांनी जरी ऐकलं तरी त्याला मुक्ती मिळते असा विश्वास या कथे दरम्यान महाराजांनी उपस्थित शिवभक्तांना दिला.

महाराष्ट्र ही महादेव राष्ट आहे. कारण ही परम पवित्र हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांची भूमी त्याच बरोबर संता ची भूमी येथे रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम महाराज, नामदेव महाराज अशा अनेक संताला जन्माला घातलेली ही भूमी आहे. परमात्मा शिव परम पवित्र आहे शिव आणि कृष्ण परमात्मा राम कृष्ण हरी यामध्ये कुठलाही भेद नाही. सत्संगामुळे विवेक प्राप्त होतो त्यामुळे जीवन सफल होते कलियुगात राक्षसी असुरी वृत्ती वाढलेली आहे. यासाठी पवित्र साधन अंतकरणाची शुद्धी आणि शिवाची प्राप्ती करणे होय. शिव कथा श्रवणाने शिवलोकाची प्राप्ती होते असेही शेवटी स्वामीजी म्हणाले श्री स्वामी जगद्गुरु, राधाकिशन जी महाराज, किशोरदास महाराज यांनी आशीर्वचन पर विचार मांडले.
बालयोगी प.पू.व्यंकट स्वामी महाराज यांचा संकल्प फळाला आला असून, पिंपळगाव येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मठ संस्थान येथील बालयोगी गोवत्स परमपूज्य व्यंकट स्वामी महाराज यांनी गेली अनेक दिवसापासून भव्य दिव्य शिवपुराण कथा व 108 कुंडी महायज्ञ होण्यासाठी अथकपरिश्रम घेतले. सर्व भाविक भक्त गण परिवार यांच्या सहकार्याने आज त्यांची तपस्या फळाला आली. पिंपळगाव येथे होत असलेल्या भव्य दिव्य सोहळ्याची कथा प्रवक्ते राजेंद्र दास स्वामी यांनी व उपस्थित साधुसंतांनी प्रशंसा केली. गोवत्स व्यंकट स्वामी यांनी केलेली कठोर तपस्या संकल्प आज फळाला आल्याचे सर्वांना दिसून आले.
देशभरातील साधुसंतांची महंतांची उपस्थिती पिंपळगाव संस्थान येथील शिवपुराण कथा सोहळ्यास महंत अजय पुरीजी उत्तर काशी, प्रदीप भाई जी बद्रीनाथ धाम, मोहनदासजी वृंदावन धाम, स्वामी रवींद्रनाथजी सरस्वती, ईश्वरदास महाराज ऋषिकेश, गंगाधर जी महाराज मलुपपीठ, महामंडलेश्वर दिनकर बंधु दास महाराज, गौरीशंकर महाराज आयोध्या, श्रीशैलम जगद्गुरु महास्वामी, डॉक्टर चेन्न सिद्धराम पंडिता, महंत मनोहर शरणदास, राधाकृष्ण जी महाराज, महंत संदीपदास, सिताराम दास त्यागी, महंत भरत दास जी महाराज, महंत प्रभुदास महाराज यांच्यासह भारतातील मान्यवर साधुसंत महंत उपस्थित होते.