P. P. Rajendradasji Maharaj ; महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे – प. पु. राजेंद्रदासजी महाराज
नांदेड/भोकर/हदगाव/हिमायतनगर l संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र भूमी पावन झालेली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग एका महाराष्ट्रात असून, ही संतमहंतांची भूमी असल्याचे सांगत पिंपळगाव येथील दत्त संस्थान या तीर्थक्षेत्रावर होत असलेली शिवमहापुराण कथा अत्यंत पुण्यदायी आहे. असे अध्यात्मिक विचार शिव महापुराण कथा प्रवक्ते स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्य जी महाराज वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांनी कथा प्रसंगातून बोलताना मांडले.
हदगाव तालुक्यातील श्री दत्त संस्थान तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, कथेच्या प्रारंभी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. साधू संत महंत यांची हत्ती, घोडे, पालखी रथातून मिरवणूक काढण्यात आली. भजनी दिंड्या व महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतले होते.
...
