Homeमराठी पत्रकार परिषदेच्या औरगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी सुनीलचंद्र वाघमारे, तर सचिव पदी...

मराठी पत्रकार परिषदेच्या औरगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी सुनीलचंद्र वाघमारे, तर सचिव पदी कानिप अन्नपूर्णे -NNL

नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी श्री सुनीलचंद्र वाघमारे व सचिव पदी श्री कानिप अन्नपूर्णे यांची एकमताने निवड करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव श्री बालाजी सूर्यवंशी यांनी ही निवड जेष्ठ पत्रकार श्री प्रमोद माने यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली. परिषदेचे राष्ट्रीय नेते श्री. एस. एम. देशमुख यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षासाठी असेल.

या निवडीचे एस. एम. देशमुख विश्वस्त किरण नाईक व परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी स्वागत केले. या प्रसंगी पत्रकार महादेव जामनिक, ब्रह्मानंद चक्करवार यांची उपस्थिती होती. या कार्यकारिणीत ग्रामीण भागातील पत्रकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments