Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shahidi Shatabdi and Guru-ta-Gaddi Samagam ; शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Shahidi Shatabdi and Guru-ta-Gaddi Samagam ; शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धार्मिक, नांदेड, मुंबई
मुंबई| गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा ३५० वा शाहिदी आणि गुरुगोविंद सिंगजी यांचे ३५० वा गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड, नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देली. या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी यांचा इतिहास निश्चितच पुढील पिढीपर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी श्री गुरु तेग बहादूर ३५० शाहिदी समागम व गुरु गोविंद सिंग गुरु-ता-गद्दी समागम कार्यक्रमाच्या आयोजनबाबत राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस राज्यस्तरीय समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिह महाराज, संत रघुमुनीजी महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, शरद ढोले उपस्थित होते. मुख्यम...
Pandharpur for Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी १५ लाख भाविक येण्याचा अंदाज

Pandharpur for Ashadhi Wari : पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी १५ लाख भाविक येण्याचा अंदाज

धार्मिक, नांदेड, मुंबई
पंढरपूर| पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला रंगणार आहे. प्रशासनाच्या वतीने वारीच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. आज (बुधवारी) परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे पंढरीत येत आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार हजार ७०० बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी अंदाजे १५ लाख भाविक येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. वारीच्या निमित्ताने पंढरीत १५ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय ड्रोनद्वारे देखील गर्दीवर नियंत्रणाचे नियोजन आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून पंढरीत आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी दिली जाते. यंदाही त्याचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. वारकऱ्यांना परिवहन...
Kumbh Mela : जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Kumbh Mela : जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, धार्मिक
नाशिक| कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहु...
Hanuman temple ; हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्न करणार प्रशांत भाऊ राठोड यांचे प्रतिपादन

Hanuman temple ; हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्न करणार प्रशांत भाऊ राठोड यांचे प्रतिपादन

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहराच्या घाटाखाली मालवाडा गावाला लागून असलेल्या पवित्र नवसाला पावणाऱ्या श्री हनुमान मंदिराकडे तसेच हनुमान मंदिरापासून पुढे गिट्टी क्रेशर मालवाडा आणि पौराणिक खंड्याखोरी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य झाले असून अनेक वर्षापासून मागणी होऊनहीं रस्ता झाला नाही पवित्र हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी सेवा संकल्प प्रतिष्ठानचे श्री प्रशांत भाऊ राठोड हे गेले असता रस्त्याची वाईट अवस्था पाहून त्यांनी तात्काळ प्रभावाने रस्ता बनविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे यावेळी सांगितले सनदी अधिकारी श्री प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून प्रत्येक गाव खेड्यात लग्न समारंभ मयतांच्या घरी घरी चहा पानाच्या कार्यक्रमासाठी तसेच इतरही कार्यक्रमात सामाजिक कार्यक्रमात ते हजेरी लावत असतात. तसेच गोरगरिबांच्या सुखदुःखातही ते भेटी देऊन सांत्वन करत दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करत दिन...
Sanatan Sanstha : खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था

Sanatan Sanstha : खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – सनातन संस्था

मुंबई, धार्मिक
फोंडा, (गोवा)| १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात पार पडलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा देशस्तरावर स्तरावर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करणारा एक अपूर्व सोहळा ठरला. या तीन दिवसीय ऐतिहासिक महोत्सवाने ‘न भूतो न भविष्यति’ असा ठसा उमटवला असून खर्‍या अर्थाने ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद झाला असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सांगितले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची समारोपीय पत्रकार परिषद नुकतीच पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. श्री. वर्तक पुढे म्हणाले की, गोव्याच्या इतिहासात भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक लोकांचा एवढे भव्य, नेत्रदीपक आणि नियोजनबद्धपणे झालेला एकमेव कार्यक्रम होता, असे मत अनेक विचारवंत, प्राध्यापक, उद्योजक, लेखक, संपादक, केंद्रीय मंत्री आणि प्रतिष्ठित यांनी मत व्यक्त केल्याची माहिती देतांनाच दरवर्षी अशा प्रकारच्या शंखनाद...
Maharana Pratap Singh Jayanti : माहुर येथे महाराणा प्रतापसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Maharana Pratap Singh Jayanti : माहुर येथे महाराणा प्रतापसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| हिंदू क्रांतीसूर्य विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची ४८५ वि जयंती गुरुवार दिनाक २९ मे रोजी महाराणा प्रतापसिंह चौक येथे साजरी करण्यात आली. आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.या वेळी शहरातून भव्य मिरवणुक (शोभायात्रा) काढण्यात आली . विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त भव्य मिरवणुकिचे आयोजन महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक उत्सव समिती कडून करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षीही ( तिथी नुसार ) महाराणा प्रताप यांची ४८५ जयंती साजरी करण्यात आली. विरशिरोमनी महाराणा प्रताप चौक प्रभाग क्र.५ येथे सकाळी ११ वा प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात येऊन सायंकाळी ५ वाजता नगरसेवक गोपु महामुने.निळकंठ मस्के, बजरंगसिंह हजारी,विजय आमले, संतोष दूबे,नयनसिंह राठौर.सुमेरसिंह ठाकुर. राजाराम गंदेवाड, ...
Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जयंती वर्ष

Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जयंती वर्ष

नांदेड, धार्मिक
नांदेड| पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी शहरातील शिवाजीनगर मंडळ भाजपा शाखेच्या वतीने गुरुवार दि. 29 मे रोजी सकाळी शहराच्या चैतन्यनगर येथील महादेव मंदिर व परिसरात स्वछता व मंदिरात विजय येवणकर, मंडळ अध्यक्ष अमित वाघ यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आहे. यावेळी माजी नगरसेवक नागनाथ गड्डम , संतोष मानधने, गिरीश भंडारी, संदीप लहानकर महेश मुखेडकर, संदीप लहानकर,किशन कल्याणकर -,तुषार पाटील,संतोष पत्तेवार ,अजय यादव,संतोष चव्हाण प्रथम चोधरी,सुनील देबडवार,सीमंत पांडे,साहिल गोयल,आदर्श चौधरी,अर्जुन परदेशी,ऋषिकेश थुले ,कृष्णा मंडले,यश कदमसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक कार्य, न्यायप्रियतेची परंपरा आणि जनसेवेतील योगदान याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या आदर्श जीवनशैलीचा आदर्श घेऊन समाजसेवेच...
Tulja Bhavani Devi Temple : तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

Tulja Bhavani Devi Temple : तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

धार्मिक, मुंबई
मुंबई| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने यासंबंधीच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला होता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्रीतुळजाभवानी देवीला महत्वं आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टी...
CIDCO Balaji Temple ; सिडको बालाजी मंदिर येथील वार्षिक ब्रम्होत्सव उत्सवाचे आयोजन

CIDCO Balaji Temple ; सिडको बालाजी मंदिर येथील वार्षिक ब्रम्होत्सव उत्सवाचे आयोजन

नांदेड, धार्मिक
नांदेड l श्री भगवान बालाजीं मंदिर सिडकोचा 35 वा वार्षिक ब्रम्होत्सवा 28 में ते 5 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम व श्रीमद् भागवत कथा पारायण सोहळा भागवत कथाकार हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या समधुर वाणीतून 28 मे ते4जुन पर्यंत दुपारी 1 ते 4 यावेळत आयोजित करण्यात आली असून ब्रम्होत्सव उत्सव निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त समिती व उत्सव समिती यांनी केले आहे. श्री. बालाजी मंदिर सिडको येथे 35 व्या वार्षिक बालाजी महोत्सव निमित्ताने 28 मेते5 जुनं पर्यंत दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे तर दैनंदिन धार्मिक कार्यक्रम मध्ये आचार्य पंडित सतिश गुरू सिडको व मंदिर पुजारी व्दियांशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने अभिषेक होमहवन, यासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. दि.28 में पासून हभप अनिल मह...
Shri Sankatmochan Hanuman ; हडकोच्या शनी मंदिर व संकटमोचन हनुमान मंदिरात सोमवंती अमावास्या निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Shri Sankatmochan Hanuman ; हडकोच्या शनी मंदिर व संकटमोचन हनुमान मंदिरात सोमवंती अमावास्या निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l हडको येथील श्री शनी मंदिर,श्री संकटमोचन हनुमान मंदिर देवस्थान येथे 22 व्या श्री शनी जन्मोत्सव सोहळा निमित्ताने सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक भक्तांनी विधीवत पूजन करून घेतले दर्शन यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा लाभ घेतला. 27 में रोजी सोमवंती अमावास्या निमित्ताने 22 वा शनि जन्मोत्सव सोहळा श्रीशनी व श्री संकटमोचन हनुमान मंदिर येथे साजरा करण्यात आला यावेळी सकाळी 51 किलो तेलांचा अभिषेक श्री प्रविण महाराज टोंगे यांच्या अधिपत्याखाली मंत्रोच्चार व विधीवत पूजन करून साजरा करण्यात आला यावेळी शनि महात्म्य,महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. गेल्या तिस वर्षांनंतर यावर्षी श्री शंकर भगवान व लाडक्या शिष्यांचा जन्मोत्सव एकच दिवशी येत असल्याने सोमवंती अमावास्याला महत्त्व होते,27 में रोजी सकाळी 6 वाजता सामुदायिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आल...
error: Content is protected !!