नांदेड| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी शहरातील शिवाजीनगर मंडळ भाजपा शाखेच्या वतीने गुरुवार दि. 29 मे रोजी सकाळी शहराच्या चैतन्यनगर येथील महादेव मंदिर व परिसरात स्वछता व मंदिरात विजय येवणकर, मंडळ अध्यक्ष अमित वाघ यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आहे.


यावेळी माजी नगरसेवक नागनाथ गड्डम , संतोष मानधने, गिरीश भंडारी, संदीप लहानकर महेश मुखेडकर, संदीप लहानकर,किशन कल्याणकर -,तुषार पाटील,संतोष पत्तेवार ,अजय यादव,संतोष चव्हाण प्रथम चोधरी,सुनील देबडवार,सीमंत पांडे,साहिल गोयल,आदर्श चौधरी,अर्जुन परदेशी,ऋषिकेश थुले ,कृष्णा मंडले,यश कदमसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक कार्य, न्यायप्रियतेची परंपरा आणि जनसेवेतील योगदान याचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या आदर्श जीवनशैलीचा आदर्श घेऊन समाजसेवेची प्रेरणा घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमातून स्वछता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.
