Extension of Nagpur Madgaon Pratiksha : नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २८ फेब्रुवारी२०२५ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपूर| नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खान्देश,विदर्भ ते कोकण चालणारी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालवली जाणार आहे

खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती मकर संक्रांत,महाशिवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालवली जाणार आहे सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून दर बुधवार,शनिवारी दु.०३.०५ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४५ वाजता पोहोचेल

मडगाव गोवा ते नागपुर जं दरम्यान धावताना हि गाडी ०११४० गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथून रा.०८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.४५ वाजता नागपुर जं येथे पोहोचेल नागपुर जं. ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं,पुलगाव,धामणगाव,बडनेरा जं,अकोला जं,शेगांव,मलकापूर, भुसावळ जं,नाशिक रोड,ईगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,माणगांव,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड,कणकवली,कुडाळ,सावंतवाडी रोड,थिवीम,करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे या दोन महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजुच्या मिळुन ३४ फेऱ्या होणार आहेत या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण www.enquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व NTES,Indian Rail Connect ॲपवर भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर आरक्षणदि.२९ डिसेंबर २०२४ पासुन सुरु करण्यात आले आहे

नागपुर जं मडगाव नागपुर जं प्रतिक्षा व्दितीय साप्ताहिक एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी(रजि.) संस्थापक अध्यक्ष श्री.सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव(रजि.)सौ माधुरी शर्मा,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,विदर्भ खान्देश मराठवाडा संपर्कप्रमुख तथा प्रांतप्रमुख श्री.वैभव बहुतूले,देवगड संपर्कप्रमुख ओमकार उमाजी माळगांवकर,कुडाळ ठाणे संपर्कप्रमुख चैतन्य धुरी,मंडणगड संपर्कप्रमुख संदेश गांधी बस प्रवासी संघटना शेगांवच्या कुमारी कुसुम चौहान,प्रवासी सुधीर राठोड,अनिल राठोड,दिपक सोनवणे, विदर्भ-खान्देश कृषी-मेडिकल विद्यापीठ-मेडिकल कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थीनी वर्गाकडून करण्यात आले आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button