Homeक्राईमCrime news : लोहामध्ये अल्पवयीनावर प्राणघातक हल्ला; आरोपी अवघ्या काही तासांत अटकेत,...

Crime news : लोहामध्ये अल्पवयीनावर प्राणघातक हल्ला; आरोपी अवघ्या काही तासांत अटकेत, चाकू जप्त

लोहा | लोहा शहरात अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.

लोहा शहरात जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

या प्रकरणी मेघराज वसंतराव राठोड (वय १८, व्यवसाय – शिक्षण, रा. वाळका, ता. किनवट, जि. नांदेड) यास आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेला लोखंडी चाकू (किंमत अंदाजे ₹२००)आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) अंतर्गत कलम १२६(२), १०९, ११५(२), १८९(२), १९१(२), (३), १९०, ३५२, ३५३(२), ३५१(३) तसेच बाल न्याय अधिनियम व अन्य संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जनार्दन यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

या घटनेनंतर शहरात दहशत माजवणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे. पुढील तपास लोहा पोलीस करत असून आरोपीस न्यायालयात हजर केले जाणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments