Friday, May 15

Tag: Fatal attack on a minor in Loha

Crime news : लोहामध्ये अल्पवयीनावर प्राणघातक हल्ला; आरोपी अवघ्या काही तासांत अटकेत, चाकू जप्त

Crime news : लोहामध्ये अल्पवयीनावर प्राणघातक हल्ला; आरोपी अवघ्या काही तासांत अटकेत, चाकू जप्त

क्राईम, नांदेड
लोहा | लोहा शहरात अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक करत कडक कारवाई केली आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. लोहा शहरात जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी मेघराज वसंतराव राठोड (वय १८, व्यवसाय – शिक्षण, रा. वाळका, ता. किनवट, जि. नांदेड) यास आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. तसेच हल्ल्यात वापरण्यात आलेला लोखंडी चाकू (किंमत अंदाजे ₹२००)आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) अंतर्गत कलम १२६(२), १०९, ११५(२), १८९(२), १९१(२), (३...
error: Content is protected !!