नांदेड| गेल्या 11/9/24 च्या व 27/4/25 च्या भेटीत नांदेडचे राज्यसभा खासदार तथा मा.मुख्यमंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रदिर्घ चर्च्या करून पूर्ण निवेदन अक्षरशः शब्दशः वाचून व अभ्यासून ज्येष्ठ नागरीकासाठी मुख्यमंत्री महोदयांना व संबधित समाज कल्याण मंत्रीमहोदयांना पत्र लिहून सोडविण्याची शिफारस करतो. प्रत्यक्ष भेटीतही चर्चा करून मानधनासह प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो असा शब्द दिला होता.


त्या प्रमाणे तेव्हाचे मा.मुख्य मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दि. 11/9/24 ला शिफारस पत्र लिहिले आहे आणि दि.27/7/2025 ला मा.ना. संजयजी शिरसाठ साहेब, समाजकल्याण व सामाजिक न्याय मंत्री महोदयांना शिफारस पत्र दिले आहे. तसेच मा. खा. जया बच्चन (जया बहादूरी) प्रमाणे मी पण वेळ प्रसंगी राज्यसभेत ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह प्रलंबित प्रश्नासंबंधी चर्चा करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीशी ही चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतो असा शब्द दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून मा.ना. संजयजी शिरसाठ यांनाही शिफारस पत्र दिल्याने मा.अशोक रावजी चव्हाण साहेबांनी तो शब्द पाळल्याने सकळ ज्येष्ठ नागरिकांच्या आशा आता नव्याने पल्लवित झाल्या आहेत.
