Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ganpati special trains : भारतीय रेल्वे गणपती विशेष 380 रेल्वे फेऱ्या चालवणार

Ganpati special trains : भारतीय रेल्वे गणपती विशेष 380 रेल्वे फेऱ्या चालवणार

धार्मिक, नांदेड, मुंबई
नवी दिल्ली| भारतीय रेल्वेने यावर्षीच्या उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 380 गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवणार आहेत. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील उत्सव प्रवासांची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य मध्य रेल्वे 296, पश्चिम रेल्वे 56, कोंकण रेल्वे 6 तर दक्षिण रेल्वे 22 फेऱ्या चालवेल. गणपती विशेष रेल्वे सेवा 11 ऑगस्टपासून सुरू गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून, 11 ऑगस्टपासून गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. या विशेष रेल्वे सेवांचा विस्तार कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर झाला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले आहेत. यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, खान्देश्वर, रत्नागिरी, कुदळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, काणकोण...
Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| "मोबाईल ही विना वासाची दारू आहे. दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल असून, लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल देणे त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरते. त्यामुळे माता–पित्यांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये," असा मौलिक संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला. श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सवाच्या समारोपप्रसंगी श्री परमेश्वर मंदिर, हिमायतनगर येथे आयोजित मार्गदर्शन समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, "संस्कारातूनच पिढी घडते, हे जिजाऊ व सावित्री बाईंच्या कार्यातून शिकायला हवे. मुलांवर चांगले संस्कार करा, मुलांना सैनिकांचा आदर्श द्या. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांसाठी दररोज एक वेळ प्रार्थना करायला हवी." "मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा, चांगले संस्कार द्या आणि देशासाठी सैनिक घडवा. आज घडीला...
Shri Vimaleshwar Mahadev Temple ; श्रावण समाप्तीनिमित्त तहसीलदार संजय वारकड यांचा सहपरिवार श्री विमलेश्वर महादेव मंदिरात पूजन सोहळा

Shri Vimaleshwar Mahadev Temple ; श्रावण समाप्तीनिमित्त तहसीलदार संजय वारकड यांचा सहपरिवार श्री विमलेश्वर महादेव मंदिरात पूजन सोहळा

धार्मिक, नांदेड
मरळक l पंचक्रोशीत श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाणारे मरळक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या समाप्तीनिमित्त भक्तिमय उत्साहात पूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यास नांदेडचे तहसीलदार मा. संजय वारकड यांनी सहपरिवार उपस्थित राहून महादेवाची पूजा-अर्चा केली. मंदिरात भाविकांची गर्दी श्रावण मासाच्या अखेरीस आयोजित पूजनावेळी मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. या वेळी दैनिक श्रमिक लोकराज्यचे कार्यकारी संपादक वैजनाथ स्वामी, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, तलाठी शिराळे,पोलिस पाटील शिवदास स्वामी तसेच पुजारी मन्मथ स्वामी, शिवदास (भुरु) स्वामी, विमलेश्वर स्वामी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांचा सत्कार मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मा. संजय वारकड यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. पूजनानंतर महाआरतीचा सोहळा संपन्न झाला. आरतीच्या वेळी "हर हर ...
Ganeshotsav : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

Ganeshotsav : राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन

नांदेड, धार्मिक, मुंबई
नांदेड| राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी केली. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनहीस्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महारा...
Ashtavinayak Temple ; सिडको मोढां मार्केट विकासासाठी कटिबद्ध, अष्टविनायक मंदिर मुर्ती स्थापन प्रसंगी आश्वासन..

Ashtavinayak Temple ; सिडको मोढां मार्केट विकासासाठी कटिबद्ध, अष्टविनायक मंदिर मुर्ती स्थापन प्रसंगी आश्वासन..

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको मोढा मार्केट विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून अष्टविनायक मंदिरासाठी सार्वगिण विकासा साठी प्रयत्नशिल असल्याने प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी श्री.अष्टविनायक गणपती मुर्ती स्थापना प्रसंगी केले. श्री.अष्टविनायक गणपती मंदिर संस्थान,श्री गणेश नगर, मोंढा मार्केट, लातूर फाटा, सिडको येथे 20 ऑगस्ट रोजी मुर्ती स्थापना करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव बोढारंकर पाटील,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महानगर अध्यक्ष विनोद कांचनगिरे, संतोष कांचनगिरे, माजी नगरसेविका डॉ.ललिता शिंदे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच...
Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन

Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन

नांदेड, धार्मिक
नांदेड l येथील मगनपुरा – नवा मोंढा भागातील महालिंगेश्‍वर महादेव मंदीर येथे श्रावणमासानिमित्ताने बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा वैजू सोनी पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी , स.विरेंद्रसिंघ गाडीवाले, नगरसेवक प्रतिनिधी भालचंद्र पवळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते विशाल शुक्ला, प्रशांत अंकरला ,स.जसपालसिंघ कोल्हापुरे,बैजू सोनी, सौ.सदिच्छा सोनी -पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मगनपुरा , वसंतनगर, विनायकनगर, विष्णुनगर,बाबा नगर आनंद नगर दयानंद नगर, नवा मोंढा , खोब्रागडेनगर या भागासह शाहूनगर जवाहर नगर, हर्षनगर येथील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला. महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथील महाप्रसादाच्या यशस्वी आयोजनासाठी परि...
Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी नांदेड येथे चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी..

Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी नांदेड येथे चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी..

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे श्रावण मास चौथ्या सोमवार निमित्ताने 18 ऑगस्ट रोजी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय ,जय काळेश्वर ,हर हर महादेव, जय घोषणा देण्यात आल्या, श्रावण सोमवार शेवट असल्याने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर नदीकाठच्या किनाऱ्यावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते, ग्रामपंचायत विष्णुपुरी सरपंच सौ.सौंध्या विलास हंबर्डे व ऊपसरपंच सौ.अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पूजन केले तर महाअभिषेक करण्यात आला तर रात्री दर्शनासाठी 12 वाजता महाअभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळ पासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन ...
Ghuman Yatra : नानक साई फाऊंडेशन ची संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोबर महिन्यात पंजाब -दिल्ली -शिमला दौऱ्यावर जाणार

Ghuman Yatra : नानक साई फाऊंडेशन ची संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोबर महिन्यात पंजाब -दिल्ली -शिमला दौऱ्यावर जाणार

धार्मिक, नांदेड
नांदेड l महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी यावर्षीची ११ वी संत नामदेव घुमान यात्रा ऑक्टोबर महिन्यात पंजाब दिल्ली शिमला दौऱ्यावर जाणार आहे. नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, यंदाची यात्रा अकरावी यात्रा २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणार आहे. संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे. सुवर्ण मंदिर, अमृतसर येथे दर्शन व वाघा बॉर्डरवर राष्ट्रभक्तीचा थरारक अनुभव. दिल्ली, शिमला, चंदिगड, भटिंडा, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, जालियनवाला बाग या महत्त्वाच्या स्थळांना भेट. रामतीर्थ (लव–कुश जन्मस्थळ), वाल्मिकी आश्रम, भद्रकाली माता मंदिर,...
Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथील बजरंग दल शाखेच्या पुढाकारातून सहस्रकुंड धबधबा ते हिमायतनगर (वाढोणा) दरम्यानची भव्य पायी कावड यात्रा उत्साहात काढण्यात आली. मुसळधार पावसातही ४०० ते ५०० कावडधारी युवकांनी भगवे झेंडे आणि कावड घेऊन सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवित्र श्रावण मासात वाढोणा येथील बजरंग दल तर्फे आयोजित भव्य कावड यात्रेच्या पूर्व दिनी रविवारी सायंकाळी शेकडो युवक पैनगंगा नदीकाठावरील सहस्त्रकुंड बाणगंगा महादेव मंदिराकडे प्रस्थान झाले. सकाळी अभ्यंगस्नान करून महादेवाचे दर्शन व महाआरती करण्यात आली. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सहस्रकुंड येथे कावडधाऱ्यांचे भव्य स्वागत करून ट्रस्टच्या वतीने सर्व कावडधारी युवकांना टीशर्ट वितरित करण्यात आले. त्यानंतर “हर हर महादेव… जय श्रीराम” या घोषणांनी गगन दुमदुमवत कावड यात्रा सुरू ...
Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल

Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यातील धार्मिक वातावरणात श्री परमेश्वर मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. मंदिरात सुरू असलेल्या अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल होत असून यात दररोज शेकडो भाविक सहभागी होत आहेत. या यज्ञाचा समारोप दिनांक २१ ऑगस्ट रोजी अभिषेक, महापूजा व भव्य महाप्रसादाने होणार आहे. पिंपळगाव येथील दत्त संस्थांचे मठाधिपती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची वाटचाल सुरु आहे. अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञात सहभागी होऊन भक्तगणांनी मोठ्या श्रद्धा, विश्वास व उत्साहाने नामस्मरणात करत आहेत. मंदिर परिसरात दिवसरात्र अखंडपणे चालणारा हा जप संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत आहे. नामजपाच्या ध्वनीमुळे संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमून गेला ...
error: Content is protected !!