HomeनांदेडShri Vimaleshwar Mahadev Temple ; श्रावण समाप्तीनिमित्त तहसीलदार संजय वारकड यांचा सहपरिवार...

Shri Vimaleshwar Mahadev Temple ; श्रावण समाप्तीनिमित्त तहसीलदार संजय वारकड यांचा सहपरिवार श्री विमलेश्वर महादेव मंदिरात पूजन सोहळा

मरळक l पंचक्रोशीत श्रद्धेचे केंद्रस्थान मानले जाणारे मरळक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या समाप्तीनिमित्त भक्तिमय उत्साहात पूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यास नांदेडचे तहसीलदार मा. संजय वारकड यांनी सहपरिवार उपस्थित राहून महादेवाची पूजा-अर्चा केली.

मंदिरात भाविकांची गर्दी

श्रावण मासाच्या अखेरीस आयोजित पूजनावेळी मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. या वेळी दैनिक श्रमिक लोकराज्यचे कार्यकारी संपादक वैजनाथ स्वामी, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, तलाठी शिराळे,पोलिस पाटील शिवदास स्वामी तसेच पुजारी मन्मथ स्वामी, शिवदास (भुरु) स्वामी, विमलेश्वर स्वामी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदारांचा सत्कार

मंदिर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार मा. संजय वारकड यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. पूजनानंतर महाआरतीचा सोहळा संपन्न झाला. आरतीच्या वेळी “हर हर महादेव” चा गजर घुमला आणि वातावरण अधिकच मंगलमय झाले.

पंचक्रोशीतले श्रद्धास्थान

मरळक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर हे पंचक्रोशीत प्रसिध्द असून दरवर्षी श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे येऊन दर्शन घेतात. यंदाही श्रावण समाप्ती निमित्त झालेल्या पूजन व महाआरतीमुळे गाव व परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments