HomeनांदेडKaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी नांदेड येथे चौथ्या श्रावण सोमवार...

Kaleshwar Temple ; तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी नांदेड येथे चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी..

नवीन नांदेड l भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे श्रावण मास चौथ्या सोमवार निमित्ताने 18 ऑगस्ट रोजी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले, यावेळी महादेवाचा गजर करत दर्शन रांगेत जय ,जय काळेश्वर ,हर हर महादेव, जय घोषणा देण्यात आल्या, श्रावण सोमवार शेवट असल्याने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर नदीकाठच्या किनाऱ्यावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते, ग्रामपंचायत विष्णुपुरी सरपंच सौ.सौंध्या विलास हंबर्डे व ऊपसरपंच सौ.अर्चना विश्वनाथ हंबर्डे यांनी विधीवत पूजन केले तर महाअभिषेक करण्यात आला तर रात्री दर्शनासाठी 12 वाजता महाअभिषेक ,संध्याकाळी गोदावरी माता व काळेश्वर आरती आयोजित केली होती यानंतर सकाळ पासून मोठ्या प्रमाणात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले, डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

विश्वस्त समिती यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने चौथ्या सोमवार 18ऑगस्ट रोजी भाविक भक्तांची दर्शन साठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता दर्शन साठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती, तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालासाहेब रोकडे यांच्या सह सहाय्यक पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक,पोलीस अमलंदार 60,महिला पोलीस20,होमगार्ड65 यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विश्वस्त समिती पुजारी ,सतीश महाराज,शिवलिंग धनमणे यांनी विधीवत व मंत्रोच्चाराने महाअभिषेक केल्यानंतर रात्री एक वाजल्यापासून भाविक भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात आले,महाआरती तर सायंकाळी गोदावरी माता नदीच्या काठावर महाआरती व काळेश्वर मंदिरात संध्याकाळी आरती आयोजित करण्यात आले होते व श्रावणमास निमित्ताने दैनंदिन श्रावणमास मध्ये दुपारपासून भाविक भक्तांसाठी यजमान असलेल्या डॉ .संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,
विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच सौ. संध्या विलास हंबर्डे, ऊपसरपंच अर्चना विश्वनाथ हंबर्डे सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे व ऊपसरपंच विश्वनाथ हंबर्डे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यांनी दर्शन घेऊन विश्वस्त समितीला सहकार्य केले. श्रावणमास निमित्ताने बेल पाने व फुले,यासह पुजेसाठी लागणारी दुकाने व खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दुकाने लावण्यात आली होती.

तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने विश्वस्त समिती यांच्या मार्फत भाविक भक्तांसाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, विश्वस्त समिती कोषाध्यक्ष ऊतमराव हंबर्डे,सचिव शंकरराव हंबर्डे, धारोजीराव हंबर्डे,बालाजीराव हंबर्डे‌, विठ्ठलराव हंबर्डे,यांच्या सह पदाधिकारी पोलीस पाटील प्रविण हंबर्डे,सेवादार सतीश भेंडेकर गावातील युवक यांनी उपस्थित राहून दर्शन रांगासह मंदिर परिसरात सहकार्य केले.श्रावण मास मधील शेवटच्या सोमवार‌ असल्याने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments