HomeनांदेडBalayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी...

Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

हिमायतनगर, अनिल मादसवार| “मोबाईल ही विना वासाची दारू आहे. दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल असून, लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल देणे त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरते. त्यामुळे माता–पित्यांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये,” असा मौलिक संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला.

IMG 20250821 132916 Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सवाच्या समारोपप्रसंगी श्री परमेश्वर मंदिर, हिमायतनगर येथे आयोजित मार्गदर्शन समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “संस्कारातूनच पिढी घडते, हे जिजाऊ व सावित्री बाईंच्या कार्यातून शिकायला हवे. मुलांवर चांगले संस्कार करा, मुलांना सैनिकांचा आदर्श द्या. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांसाठी दररोज एक वेळ प्रार्थना करायला हवी.” “मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा, चांगले संस्कार द्या आणि देशासाठी सैनिक घडवा. आज घडीला भारताला संस्कारी, निर्व्यसनी नवतरुण नेतृत्वाची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मंचावर माधवराव पाटील जवळगावकर, मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते सर्व संचालक मंडळी व हजारोच्या संख्येत महिला- पुरुष भाविक भक्त उपस्थित होते.

IMG 20250821 132432 Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

समारोप सोहळा उत्साहात
महिनाभर सुरू असलेल्या ॐ नमः शिवाय अखंड नामजप यज्ञाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. यावेळी विविध भजनी मंडळांचा व्यंकट स्वामी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तारा उपस्थित भाविकांना केवळ श्रावण मस्तच नाहीतर नित्य नेमाने नामजप केल्यास मनुष्य सर्व दुःखातून बाहेर येतो यासाठी नामस्मरण करत चला असा संदेश देऊन ॐ नमः शिवाय नामजप सोहळ्याचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

IMG 20250822 124424 Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

आगामी धार्मिक कार्यक्रमांची माहिती
मार्गदर्शन करताना व्यंकट स्वामी महाराज म्हणाले की, पिंपळगाव येथे येत्या वर्षात शिवमहापुराण कथेप्रमाणेच हजारो संत–महंतांच्या उपस्थितीत मोठे धार्मिक सोहळे होणार आहेत. या सोहळ्यांसाठी राजेंद्रदास महाराज तर येतीलच बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री, रामदेव बाबा यांच्यासह अनेक नामवंत संतांच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. आत्तापासूनच विविध गावकऱ्यांकडून सेवाकार्याची तयारी सुरू झाली आहे. अपनी या धार्मिक सत्संग सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होऊन योगदान द्या असे आवाहनही स्वामीजींनी केले.

IMG 20250821 134654 Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments