Balayogi Venkat Swami Maharaj : दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज
हिमायतनगर, अनिल मादसवार| "मोबाईल ही विना वासाची दारू आहे. दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल असून, लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल देणे त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरते. त्यामुळे माता–पित्यांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये," असा मौलिक संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला.
श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सवाच्या समारोपप्रसंगी श्री परमेश्वर मंदिर, हिमायतनगर येथे आयोजित मार्गदर्शन समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, "संस्कारातूनच पिढी घडते, हे जिजाऊ व सावित्री बाईंच्या कार्यातून शिकायला हवे. मुलांवर चांगले संस्कार करा, मुलांना सैनिकांचा आदर्श द्या. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांसाठी दररोज एक वेळ प्रार्थना करायला हवी." "मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा, चांगले संस्कार द्या आणि देशासाठी सैनिक घडवा. आज घडीला...

