HomeनांदेडKavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय...

Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथील बजरंग दल शाखेच्या पुढाकारातून सहस्रकुंड धबधबा ते हिमायतनगर (वाढोणा) दरम्यानची भव्य पायी कावड यात्रा उत्साहात काढण्यात आली. मुसळधार पावसातही ४०० ते ५०० कावडधारी युवकांनी भगवे झेंडे आणि कावड घेऊन सहभाग नोंदवला.

IMG 20250818 151750 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवित्र श्रावण मासात वाढोणा येथील बजरंग दल तर्फे आयोजित भव्य कावड यात्रेच्या पूर्व दिनी रविवारी सायंकाळी शेकडो युवक पैनगंगा नदीकाठावरील सहस्त्रकुंड बाणगंगा महादेव मंदिराकडे प्रस्थान झाले. सकाळी अभ्यंगस्नान करून महादेवाचे दर्शन व महाआरती करण्यात आली.

1009039843 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सहस्रकुंड येथे कावडधाऱ्यांचे भव्य स्वागत करून ट्रस्टच्या वतीने सर्व कावडधारी युवकांना टीशर्ट वितरित करण्यात आले. त्यानंतर “हर हर महादेव… जय श्रीराम” या घोषणांनी गगन दुमदुमवत कावड यात्रा सुरू झाली. या यात्रेच्या अगदी अग्रभागी असलेली प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती हे आकर्षण ठरले.

1009042547 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

सहस्रकुंड येथून निघालेल्या कावड यात्रेचे इस्लापूर, खैरगाव, वडगाव, कार्ला आदींसह मार्गातील विविध गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत झाले. तसेच कावडधाऱ्यांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. कावड यात्रा हिमायतनगर वाढोणा शहरात दाखल होताच श्री परमेश्वर मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली. हजारो भक्तांनी या निमित्ताने दर्शन लाभ घेतला. यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातर्फे भाविक भक्ताना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी संपन्न झालेली ही कावड यात्रा भगव्या झेंड्यांनी आणि भक्तिमय घोषणांनी दुमदुमली. कावड यात्रा आणि श्रावण सोमवार असल्याने मुसळधार पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

IMG 20250818 151846 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण
IMG 20250818 152008 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

1009042556 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

1009042559 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

1009039525 Kavad Yatra : रामजी की निकली सवारी… श्रावणातील भव्य कावड यात्रेने भगवेमय वातावरण

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments