Homeनांदेडसीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण...

सीईओ मीनल करणवाल यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी हिमायतनगर येथे तक्रार निवारण सभा -NNL

नांदेड| हिमायतनगर पंचायत समिती येथे गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात तक्रार निवारण सभा घेण्यात येणार आहे. हिमायतनगर तालुक्यातील विविध विषयासंदर्भात पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा यावेळी करण्यात येणार आहे.

ज्या तक्रारदारांनी तक्रारी दिलेल्या आहेत अशा तक्रारदारांना पंचायत समितीच्या वतीने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख तक्रार निवारण सभेसाठी उपस्थित राहून तक्रारींचा निपटारा करणार आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments