Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ganpati Bappa immersion : हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन

Ganpati Bappa immersion : हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे थाटात विसर्जन

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असून, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे गुरुवारी सकाळी मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिनांक २७ बुधवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घराघरात बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चना, महाप्रसादाचा भोग अर्पण करत आगामी येणारा काळ सुख समृद्धी, निरोगी व निरामय ठेऊन देशाची शांतता अबाधित ठेवण्याचे साकडे अनेकांनी गणपती बाप्पाना घातले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी एक दिवस व दीड दिवसांच्या गणरायाला भाविक भक्तांनी पांडवकालीन श्री कनकेश्वर तलावाच्या विहिरीत गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. येथील घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी बालगोपाळांसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाला साकडे घालत विसर्जन करून पुढच्या वर्...
Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत

Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात विविध वाहनातून दाखल झालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल -गोपाल व युवकांनी ढोल ताशा, फटाक्याची अतिशबाजी व गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन सोहळा संपन्न झाला.सायंकाळी ठरलेल्या शुभ मुहूर्तावर ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही गणेश चतुर्थीच्या दिवशी जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरी वर्गही आनंदात गणेशोत्सवात सामील झाले होते. भाद्रपद शुक्ल ४ दि.27 ऑगस्ट बुधवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी अनेक दिवसापासून दडी मारलेल्या वरून राजाने हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. गणेश चतुर्थी निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत था...
Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिरात भक्ताची ऐतिहासिक देणगी

Tirupati Balaji Temple : तिरुपती बालाजी मंदिरात भक्ताची ऐतिहासिक देणगी

तेलंगणा, धार्मिक
तिरुपती| आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात एका अज्ञात भक्ताने अपार श्रद्धा व्यक्त करत १२१ किलो सोने भगवान वेंकटेश्वराच्या चरणी अर्पण केले आहे. या सोन्याची बाजार किंमत तब्बल ₹१४० कोटी एवढी आहे. मंदिर प्रशासनाने या देणगीची पुष्टी केली असून, हे सोने धार्मिक सेवा व मंदिरातील विविध कार्यांसाठी वापरले जाणार आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले की, या भक्ताने व्यवसायाची सुरुवात तिरुपतीत माथा टेकून केली होती. कालांतराने त्याने ६,०००–७,००० कोटींचा उद्योग उभा केला आणि यशाचे श्रेय श्री वेंकटेश्वर स्वामींना देत १२१ किलो सोन्याची देणगी दिली आहे. सध्या दररोज भगवान वेंकटेश्वराच्या मूर्तीला सुमारे १२० किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. या भक्ताने त्याहून अधिक अर्पण करण्याचा संकल्प केला होता, जो आता पूर्ण झाला आहे. खरोखरच हा प्रसंग भक्ती, श्रद्धा व देवावरील निस्सीम प्रेमाचे ...
Shrivaraha Swamy Jayanti : पंचमुखी हनुमान मंदिर श्रीबागेश्वर धाम कार्यालयात श्रीवराह स्वामी जयंती उत्साहात साजरी

Shrivaraha Swamy Jayanti : पंचमुखी हनुमान मंदिर श्रीबागेश्वर धाम कार्यालयात श्रीवराह स्वामी जयंती उत्साहात साजरी

नांदेड, धार्मिक
नांदेड| पंचमुखी हनुमान मंदिर परिसर,श्रीबागेश्वर धाम कार्यालय, गणेश नगर, नांदेड येथे श्री वराह स्वामी जयंती मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात साधू-संत, मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सामूहिक हनुमान चालीसाचे गजर घुमला आणि वातावरण भक्तिमय झाले. यावेळी भजन संधेचे आयोजनही करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेतला. श्री वराह स्वामी जयंतीचे औचित्य साधून पंचमुखी हनुमान मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती. मंदिर परिसरात आकर्षक फुलांच्या तोरणांनी केळीच्या घडांची सजावट करण्यात आली होती. सर्वप्रथम विधिवत पूजा-अर्चा व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. त्यानंतर उपस्थित साधू-संत, गुरु महाराज व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकत्रितपणे घेतलेल्या सामूहिक हनुमान चालीसा पठणामुळे मंदि...
Ganesh Mandal : गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे

Ganesh Mandal : गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे

धार्मिक, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांना दिला जाणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या, स्टेनलेस स्टीलच्या भांडयात किंवा पारदर्शक अन्न श्रेणी प्लॉस्टीकच्या भांडयात झाकुन ठेवावा. जेणेकरुन प्रसादाला धुळ, माती, माशा, मुंग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्न पदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तीचे कपडे स्वछ असावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने साबणाने /हँड वॉशने धुवुनच कामास सुरुवात करावी. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोके व केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने शिंकने व थुंकणे तंबाखू वा धुम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्...
Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरसह परिसरातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. देवी गौरी व गणेशाच्या आगमनासाठी लागणारे फुलांचे हार, आकर्षक मूर्ती, सजावटीच्या वस्तू, मिठाई, कपडे, दागदागिने यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे. विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन बुधवारी मोठ्या जल्लोषात होणार असून, त्याचसोबत दोन दिवसात गौरी महालक्ष्मीच्या आगमन होणार असल्याने घरोघरी तयारी केली जात आहे. उत्सवाला अवघे काही दिवस बाकी असताना बाजारात गणपतीच्या सुबक मूर्ती, गौरीचे मुखवटे व पूजेचे साहित्य दाखल झाले आहे. उत्सवानिमित्त विशेषतः गृहिणींची बाजारपेठेत मोठी लगबग दिसून येत असून, यंदा बाजारात गौरी सजावटीसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक पत्र्यांच्या कोठ्यांऐवजी पुणेरी स्टँड, सजावटीचे मखर आणि आकर्षक साज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ३०० ते ७०० रुपयांदरम्या...
Namo Express : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

Namo Express : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

धार्मिक, मुंबई
मुंबई| कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. कोकणात जाणाऱ्या २ हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, "मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून येत ...
Haritalika : हरितालिका

Haritalika : हरितालिका

धार्मिक, नांदेड, लेख
भाद्रपद शुद्ध तृतीयेला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणार्‍या हरितालिका या सणाच्या दिवशी स्त्रिया आणि कुमारिका व्रतस्थ राहतात. हे व्रत करण्यामागील शास्त्र आणि या व्रताचे महत्त्व या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया. 1. इतिहास आणि उद्देश - पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. 2. व्रत करण्याची पद्धत - प्रातःकाळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पूजल्या जातात. रात्री जागरण करतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंग आणि मूर्ती विसर्जित करतात. हरितालिकेच्या पूजनाच्या वेळी 16 शक्तीस्वरूप नाममंत्रांचे पठण करत 16 पत्री शिवपिंडीवर वाहतात, त्यामुळे शिवपिंडीत शिवस्वरूप शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो. पत्रीपूजनातून अधिक प्रमाणात शक्तीची स्पंदने निर्...
eco-friendly Ganeshotsav ; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

eco-friendly Ganeshotsav ; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

धार्मिक, नांदेड
नवी दिल्ली| महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनास आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी भेट देऊन पाहणी केली. यंदा 'गणेश उत्सव' हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत मराठी तसेच मराठी भाषिक भाविकही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करीत असून महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योग विकास महामंडळाकडून दरवर्षी पर्यावरण पूरक अशा गणेश मूर्तींचे विक्री प्रदर्शन लावण्यात येते. ही खुप समाधानाची बाब असल्याचे नमूद करून श्रीमती विमला यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. शाडू मातीच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. निसर्गाशी आपली नाळ घट्ट राहावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. श्रीमती विमला यांनी श्री. शिंदे यांच...
CIDCO ; सिडको गुरूवार बाजार येथे भव्य शिवपुराण शिवकथेचा भाविक भक्तांनी घेतला लाभ,संत महंत यांच्यी तुला

CIDCO ; सिडको गुरूवार बाजार येथे भव्य शिवपुराण शिवकथेचा भाविक भक्तांनी घेतला लाभ,संत महंत यांच्यी तुला

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सिडको गुरूवार बाजार येथे श्रावणमास निमित्ताने 15 ते 21ऑगस्ट दरम्यान शिवकथाकर भागवतचार्य हभप अंकिताताई खांडगे यांचे शिवपुराण कथेस भाविक भक्तांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला, शेवटच्या दिवशी संत महंत यांच्या तुला करण्यात आलीतर महाआरतीने या कथेची सांगता करण्यात आली, यावेळी महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला. दि. 15 ते गुरुवार दि. 21 ऑगस्ट 25 दरम्यान श्रावण मासा निमित्त भव्य शिवमहापुराण (शिवकथा) व अष्टोत्तर सहस्त्रधारा रुद्राभिषेक, सव्वा लक्ष बिल्वार्थना, महामृत्युंजय स्वाहाकार होमहवन, व गुरुवर्याचे तुलाभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,गुरुपुष्य अमृत योगावर परम पुज्य गुरुवर्यचे तुलाभार दिनांक २१ ऑगस्ट गुरुवार सकाळी ११ वाजता व अष्टोत्तर सहस्त्रधारा रुद्राभिषेक सकाळी 8 ते 9 महामृत्युंजय स्वाहाकार होम हवन 9 ते 10, प्रसाद सकाळी 11 ते 12, शिवमहापुराण (शिवकथा) दुपारी 1 ते ...
error: Content is protected !!