Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

silver idol of one-faced Dattaprabhu : हदगाव दत्तबर्डी संस्थान येथे एकमुखी दत्तप्रभूंच्या ४१ किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

silver idol of one-faced Dattaprabhu : हदगाव दत्तबर्डी संस्थान येथे एकमुखी दत्तप्रभूंच्या ४१ किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

नांदेड, धार्मिक
हदगाव, शेख चांदपाशा| प्रसिद्ध श्री दत्त संस्थान, दत्तबर्डी हदगाव येथे श्री एकमुखी दत्तप्रभूंच्या ४१ किलो वजनाच्या, साडेतीन फूट उंचीच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या कार्तिक पौर्णिमा, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. सदर मूर्तीसाठी लागणारी चांदी खामगाव येथून खरेदी करण्यात आली आहे. या कार्यात सर्व दत्तभक्तांनी उत्स्फूर्तपणे मदत करून महंत श्री श्री १००८ गोपाळगीर महाराज यांचा संकल्प पूर्णत्वास नेला. ज्यांनी ज्यांनी आर्थिक व अन्य प्रकारे योगदान दिले त्या सर्व भक्तांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. चांदी खरेदी प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री १००८ महंत गोपाळगिर महाराज (दत्तबर्डी संस्थान, हदगाव), श्री १०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव मठ संस्थान) , श्री सतीशराव देशमुख, शहाजी देशमुख, शिलु देशमुख, युवानेते भास्कर दादा वानखेडे, बबनराव माळोदे, शेषराव पवार धोतरा, सचिन प...
Krishna kant Bawa : बंदासिंघ बहादूर यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना साठी शक्तीबल आणि प्रेरणा देणारा- कृष्णकांत बावा

Krishna kant Bawa : बंदासिंघ बहादूर यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना साठी शक्तीबल आणि प्रेरणा देणारा- कृष्णकांत बावा

नांदेड, धार्मिक
नांदेड| बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते, त्यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना शक्तीबल आणि प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन बंदासिंघ बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशन चे अध्यक्ष कृष्णकांत बावा यांनी केले. 1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदासिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे आला होता. थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडले. गुरुद्वारा लंगर साहिब चे जथेदार संत बाबा बलविंदरसिंघ जी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार गुरुबचनसिंग शिलेदार, जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे,माजी उपमहपौर सतीश देशमुख तरोडेकर, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीना...
Mahaprasad  : सगरोळी येथे नवनाथ पोथी समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

Mahaprasad : सगरोळी येथे नवनाथ पोथी समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

धार्मिक, नांदेड
बिलोली| तालुक्यातील सगरोळी येथील भव्य दिव्य श्री केदारेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन यावर्षी जानेवारी महिन्यात कलशरोहण कार्यक्रम संपन्न झाला. नवसाला पावणारा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दर सोमवारी नियमितरित्या प्रत्येक भाविकाच्या वतीने अभिषेक, तसेच श्री केदारेश्वर भजनी मंडळा तर्फे शिवपाठ व सायंकाळी भजनाचे कार्यक्रम होत असतात. याच परंपरेत श्रावण महिन्यात सलग ४० दिवस नवनाथांची पोथी पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या पोथीचे वाचन श्री शंकरअप्पा महाराज उदगिरे यांच्या अमृतवाणीमधून झाले. यावेळी श्रावणातील चारही सोमवारी अनुक्रमे संजय पा. चिलनोड, रमेश मलशेटवार, राजलिंगु बाबू सावकार गादेवर, मारोती पा. कुरुटगे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. पोथी पठणाची सांगता दिनांक ४ सप्टेंबर २०२५, गुरुवार रोजी श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर व श्री १०८ विरुपाक्ष शिवाचार्य ...
Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

Ganesh idols : ऍड दिलीप ठाकूर यांच्याकडे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह

नांदेड, धार्मिक
नांदेड| नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या नांदेड एस.टी. कर्मचारी गणेश मंडळाला सलग ३६ वर्षांपासून गणेशमूर्ती देण्याची अनोखी परंपरा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी जपली आहे. त्यांच्या निवासस्थानी आज सुमारे ५०० हून अधिक आगळ्या-वेगळ्या गणेशमूर्तींचा अप्रतिम संग्रह उभा राहिला आहे. क्रिकेट खेळणाऱ्या गणपतीपासून, ट्रॅव्हल बॅग घेऊन प्रवासाला निघालेल्या गणपतीपर्यंत आणि मोबाईल-लॅपटॉप हाताळणाऱ्या आधुनिक गणरायापर्यंतची विविध रूपे या संग्रहात पाहावयास मिळतात. दगड, टेराकोटा, तांबे, पितळ, फायबर, संगमरवर, बोनचायना, ब्राँझ, चंदनाचे लाकूड, रुद्राक्ष, सुपारी, नारळ, अगदी दोरी यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांतून तयार झालेल्या या मूर्ती पाहणाऱ्याला थक्क करतात. नटराज गणेश, विष्णुरूपी गणेश, हनुमानरूपी गणेश, कृष्णरूपी गणेश, रथारूढ, शेषारूढ, बटुवेशातील गणराय, वाद्यवृंदरूपी, दशावतारी, भरतनाट्यममुद्रा, स...
Prof. Devkar : भक्तीमार्गाने चालल्यास जीवनाचे कल्याण निश्चित – प्रा. देवकर

Prof. Devkar : भक्तीमार्गाने चालल्यास जीवनाचे कल्याण निश्चित – प्रा. देवकर

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| “प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात भक्तीमार्गाला महत्त्व दिले पाहिजे. साधुसंतांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण जीवन जगलो तर भविष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने सांप्रदायिक भक्तीमार्गाने चालत राहावे,” असे प्रतिपादन प्राचार्य मारोती देवकर यांनी केले. कारला पी. येथील सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने संगीत क्षेत्रातील कलावंत सचिन बोपीलवार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रा. देवकर म्हणाले की, “संत महंतांच्या विचारांनी व प्रेरणेने आपण वागत राहिलो तर समाजाप्रती आपली भावना वेगळी राहील. हरिनामाचा भक्तीमार्ग धरल्यानेच जीवनाचे कल्याण साध्य होऊ शकते. संतांच्या शिकवणुकीतूनच प्रत्येक व्यक्ती चांगल्या मार्गाने जगू शकते.” ते पुढे म्हणाले की, “बोपीलवार परिवाराने तीन पिढ्यांपासून सांप्रदायिक वारसा जपला असून, त्यांच्या भक्तीमार्गामुळेच आज त्यांनी यशाचे ...
Shiv mandir : चैतन्यनगर शिवमंदिर सभामंडपाचे १ ऑक्टोबर रोजी आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भुमिपुजन

Shiv mandir : चैतन्यनगर शिवमंदिर सभामंडपाचे १ ऑक्टोबर रोजी आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भुमिपुजन

नांदेड, धार्मिक
नांदेड| येथील चैतन्यनगर शिवमंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या भव्य सभामंडपाचा भुमिपुजन सोहळा आज सोमवार दि.01 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता होणार आहे. नांदेड उत्तर चे आमदार श्री बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते सभामंडपाचा भुमिपुजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चैतन्यनगर शिवमंदिर नांदेड शहर आणि पंचक्रशीत तसेच जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध असून श्रावण मासात मोठी गर्दी असते. दर सोमवारी शिव भक्तांनी मंदिर परिसर फुलून जातो. अत्यंत सुंदर आकर्षक असे मंदिर उभारण्यात आले आहे. येथील शंभो महादेवाची पिंड सर्वाच लक्ष वेधून घेते अशी आहे. भक्तांची गर्दी आणि त्यांची दर्शन व्यवस्था याचा विचार करून शिवमंदिर विश्वस्त मंडळाने मंदिर परीसरात भव्य असा सभामंडप होणार असून आज १ ऑक्टोबर रोजी आ. कल्याणकर यांच्या हस्ते सभामंडपाच भुमिपुजन करण्यात येणार आहे. सर्व शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आ...
Bajrang Chowk King: वाढोणा शहरातील बजरंग चौकचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Bajrang Chowk King: वाढोणा शहरातील बजरंग चौकचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा शहरातील "बजरंग चौकचा राजा" नवं प्रशांत गणेश मंडळाकडून मागील ६५ वर्षांपासून धार्मिक सलोखा जपत परंपरेने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासत हा उत्सव दरवर्षी युवा मंडळींच्या पुढाकाराने पार पडतो. यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळ-सायंकाळी दररोज महाआरती, प्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत असून लहान-थोरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सव अधिकच मंगलमय झाला आहे. मुंबईच्या धर्तीवर सजवलेली "गरुडावर आरूढ गणपती बाप्पाची भव्य व मनमोहक मूर्ती" भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. मनोकामना पूर्ण करणारा व नवसाला पावणारा गणपती म्हणून मंडळाने ख्याती मिळवली आहे. दरवर्षी प्रथम क्रमांक पटकाविण्याची परंपरा यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करून मं...
Ganesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

Ganesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

धार्मिक, नांदेड, मुंबई
नांदेड/मुंबई| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी यावेळी अमित शाह यांच्या समवेत उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्क...
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वर्षा निवासस्थानी गणरायाचे दर्शन

धार्मिक, मुंबई
मुंबई| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री. शाह यांचे गणेश मूर्ती शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मातोश्री सरिताताई फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते....
government portal : घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या पोर्टलची निर्मिती

government portal : घरोघरीच्या व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यास शासनाच्या पोर्टलची निर्मिती

धार्मिक, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्योत्सवांतर्गत घरोघरीच्या बाप्पांचे व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करणे, प्रसिद्ध मंडळे व मंदिरातील गणपतींचे थेट दर्शन मिळावे याकरिता पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलवर आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पांचे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे छायाचित्र अपलोड करू शकता. तसेच, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे व सार्वजनिक मंडळातील बाप्पांचे थेट दर्शन घेण्याची सोय देखील या पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. या संधीचा लाभ अधिकाधिक गणेशभक्तांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे....
error: Content is protected !!