Mahaprasad : सगरोळी येथे नवनाथ पोथी समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

IMG 20250903 WA0005 Mahaprasad : सगरोळी येथे नवनाथ पोथी समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

बिलोली| तालुक्यातील सगरोळी येथील भव्य दिव्य श्री केदारेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन यावर्षी जानेवारी महिन्यात कलशरोहण कार्यक्रम संपन्न झाला. नवसाला पावणारा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दर सोमवारी नियमितरित्या प्रत्येक भाविकाच्या वतीने अभिषेक, तसेच श्री केदारेश्वर भजनी मंडळा तर्फे शिवपाठ व सायंकाळी भजनाचे कार्यक्रम होत असतात.

याच परंपरेत श्रावण महिन्यात सलग ४० दिवस नवनाथांची पोथी पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या पोथीचे वाचन श्री शंकरअप्पा महाराज उदगिरे यांच्या अमृतवाणीमधून झाले. यावेळी श्रावणातील चारही सोमवारी अनुक्रमे संजय पा. चिलनोड, रमेश मलशेटवार, राजलिंगु बाबू सावकार गादेवर, मारोती पा. कुरुटगे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

पोथी पठणाची सांगता दिनांक ४ सप्टेंबर २०२५, गुरुवार रोजी श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर व श्री १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या दिवशी महाप्रसादाचे अन्नदाते मंगलपवार विठ्ठल मोहनाजी असून, सर्व महादेव भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित रहावे, असे आवाहन श्री केदारेश्वर महादेव मंदिर समिती व समस्त ग्रामस्थांनी केले आहे. तसेच गुरुवारी रात्री ८.०० वाजता शिवजागरण आयोजित करण्यात आले असून, परिसरातील सर्व भजनी मंडळांनी उपस्थित राहावे, असे विशेष आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top