Homeक्राईमHimayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी

Himayatnagar Crime news : माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला; दोघांना पोलीस कोठडी

हिमायतनगर| तालुक्यातील मंगरूळ येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दत्तक पुत्र व त्याच्या मैत्रिणीला अटक केली असून न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेनुसार, १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री माजी सरपंच शेतात झोपलेले असताना आरोपींनी लोखंडी पाइपने डोक्यावर सपासप वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम हिमायतनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून ते अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधाच्या वादातून कट रचून हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांची चौकशी सुरू आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments