Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Lightning strikes : विजांचा कडकडाट व मुसळधार पावसात घारापुरच्या हनुमान मंदिरावर वीज कोसळली – कळसाचा काही भाग खाली कोसळला

Lightning strikes : विजांचा कडकडाट व मुसळधार पावसात घारापुरच्या हनुमान मंदिरावर वीज कोसळली – कळसाचा काही भाग खाली कोसळला

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट झाला. या दरम्यान घारापुर येथील हनुमान मंदिराच्या कळसावर वीज कोसळून कळसाचा काही भाग तुटून खाली पडला. सुदैवाने मंदिर परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. या घटनेनंतर स्थानिक वारकरी संप्रदायातील भक्तांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “संकटमोचन हनुमानाने गावावरील संकट स्वतःवर घेतले, गावाची रक्षा केली.” यंदा शेतकऱ्यांनंतर आता निसर्गाचा प्रकोप सर्वत्र दिसून येत आहे. केवळ आधत्मिकतेचे वातावरण गावागावात निर्माण होऊ लागल्याने गावावरील संकट टळलं असे सत्संगाशी निगडित असणाऱ्या महिला - पुरुषांनी बोलून दाखवलं आहे.  दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे निसर्गाचा प्रकोप सर्वत्र जाणवतो आहे. मागील महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथील नागनाथ मंदिरावरही अशाच प्रकारे वीज कोसळून कळसाचा काही भा...
Deputy Chief Minister Ajit Pawar : अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar : अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

धार्मिक, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत. या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला ‘हेरिटेज टच’ द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश ...
Hanuman’s arrival : संकष्ट चतुर्थीला हनुमंताचे आगमन ! गणरायाचे दर्शन घेऊन मोदकाचा प्रसाद खाल्ला

Hanuman’s arrival : संकष्ट चतुर्थीला हनुमंताचे आगमन ! गणरायाचे दर्शन घेऊन मोदकाचा प्रसाद खाल्ला

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) संकष्ट चतुर्थीच्या पवित्र दिवशी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील गणेश मंदिरात भक्त गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होतात. मात्र, यावेळी एक विलक्षण घटना घडली. चक्क बजरंगबलीच्या अवतारातील वानर रुपी वन्य प्राणी गणेश मंदिरात दर्शनासाठी आला. मंदिरात आलेल्या या वानराने गणरायाचे दर्शन घेतल्याचे पाहून उपस्थित भाविक आश्चर्यचकित झाले. या अनोख्या प्रसंगामुळे मंदिर परिसरात काही काळ गर्दी झाली. अनेकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. भक्तांनी याला भगवान हनुमानाचे आगमन मानत त्याचा मंगल संकेत म्हणून स्वीकार केला. चक्क हनुमंताने गणरायाचे दर्शन घेऊन मोदकाचा प्रसाद खाल्ला, या घटनेमुळे संकष्ट चतुर्थीचे औचित्य अधिकच पवित्र व भक्तिरसपूर्ण झाले. गणपती बाप्पा मोरया ... जय बजरंगबली ... अश्या घोषणा उपस्थितांनी दिल्यानंतर वानर रुपी वन्य प्राणी गणेश मंदिरा...
Eid Milad-un-Nabi : नांदेड शहरात जश्ने ईद मिलाद उन नबीची भव्य मिरवणूक

Eid Milad-un-Nabi : नांदेड शहरात जश्ने ईद मिलाद उन नबीची भव्य मिरवणूक

नांदेड, धार्मिक
नांदेड| शहरात सोमवारी जश्ने ईद मिलाद उन नबी या निमित्ताने ऐतिहासिक व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिलाद कमिटी तर्फे झालेल्या या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही मिरवणूक सकाळी १० वाजता निजाम कॉलनी येथून सुरू होऊन श्रीनगर, आयटीआय, शिवाजी नगर, कला मंदिर, वजिराबाद, शिवाजी पुतळा, गांधी पुतळा, महावीर चौक, गुरुद्वारा चौक, जुना मोंढा, हबीब टॉकीज मार्गे सरकत दुपारी २ वाजता मोहम्मद अली रोड येथे समाप्त झाली. मिरवणुकीदरम्यान शहरभर “या नबी सलाम अलेक” या गजरासह धार्मिक घोषणा देत वातावरण भक्तिमय करण्यात आले. नात-शरीफ पठण, झंडे, पथक, तांड्या, बॅंड पथके तसेच मुलांचे आकर्षक वेशभूषेत सादरीकरण हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. शहरातील विविध भागात उभारलेल्या स्वागत मंडपांमधून फुलांची उधळण, प्रसाद व शीतपेय वितरण करून सहभागींचे स्वागत करण्यात आले. लहान मुलं व युवकवर्गा...
Municipal Corporation ; महापालिके मार्फत गणेशोत्सवात ४४ हजार ४७८ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ४८.२६७ मेट्रिक टन जमा झाले निर्माल्य!

Municipal Corporation ; महापालिके मार्फत गणेशोत्सवात ४४ हजार ४७८ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ४८.२६७ मेट्रिक टन जमा झाले निर्माल्य!

नांदेड, धार्मिक
नांदेड l यंदाच्या गणेश उत्सवात नांदेडकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला,परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव नांदेडकरा तर्फे साजरा केला गेला,विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवात ४८.२६७ मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले, तर मूर्ती संकलन केंद्रात ९ हजाराहून अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत. तर एकूण ४४ हजार ४७८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे,होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात आली होती. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे देखील आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व नागरिकांना केले होते. नांदेड वाघाळा शहर ...
Jai Maharashtra Ganesh Mandal ; बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मीचा नृसिंह देखाव्याचे श्री विसर्जन मिरवणूक मध्ये आकर्षण

Jai Maharashtra Ganesh Mandal ; बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मीचा नृसिंह देखाव्याचे श्री विसर्जन मिरवणूक मध्ये आकर्षण

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातून निघालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत बळीरामपूर चा जय महाराष्ट्र गणेश मंडळाचा ऑपरेशन सिंदूर व जय महालक्ष्मी मंडळाच्या नृसिंह देखावा आकर्षण ठरला होता , सादरीकरण नंतर भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी व गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी परिसर दणाणून गेला, यावेळी रस्त्यावरील दुतर्फा महिला युवक नागरिक यांनी टाळ्यांचा गजरात स्वागत केले तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी मध्ये स्वागत करून कलाकारांना प्रोत्साहन दिले. सिडको हडको परिसरातून श्री गणेश विसर्जन भव्य मिरवणुकीचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले यावेळी सहभागी झालेल्या बळीरामपूर येथिल जय महाराष्ट्र गणेश मंडळाने नुकत्याच पहलगाम येथील झालेल्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करीत एक उत्तम देखावा सादर केला होता. देशभक्तीचा संद...
Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन

Ganapati idol in Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपतीचे महाआरतीनंतर थाटात विसर्जन

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील मानाच्या गणपती बाप्पाचे अनंत चतुर्दशी निमित्त शनिवारी (दि. ६) टाळ मृदंगाच्या वाणीमध्ये भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपती स्थापनेच्या १० व्या दिवशी निघालेली विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता गाजत सुरू झाली. टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात तसेच वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांच्या माउली गीतांमध्ये गणरायाची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. बजरंग चौक, कालिंका गल्ली, बाजार चौक, मारोती मंदिर, सराफा लाईन आदी ठिकाणी नागरिकांनी मिरवणुकीचे स्वागत करत भक्तिभावाने मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले. मिरवणूक श्री कनकेश्वर तलावाजवळ पोहोचल्यावर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाची महाआरती करण्यात आली. त्यान...
sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

sound of Tal-Mridangam : आंदेगावात पारंपरिक पद्धतीने टाळ-मृदंगाच्या गजरात नवव्या दिवशी गणपती विसर्जन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (नविन) येथे हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या भक्तीगीत आणि टाळमृदंगाच्या गजरात उत्साहात (Ganpati immersion on the ninth day in Andegaon in the traditional manner amidst the sound of Tal-Mridangam) पार पडली. गणेश उत्सवानिमित्ताने नऊ दिवसापूर्वी गणेश चतुर्थीला येथील युवकांनी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ स्थापन करून नवीन आंदेगांव येथे परंपरेप्रमाणे उत्सव साजरा केला. दरम्यान विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्या बरोबर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डीजे वा गुलालाची उधळण टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. टाळ, मृदंगाच्या वाणीने काढण्यात आलेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने गावात भक्तीमय वाताव...
Nine Days Ganesha Immersion : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नऊ दिवसांच्या पाच गावातील सहा गणपतीचे विसर्जन

Nine Days Ganesha Immersion : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नऊ दिवसांच्या पाच गावातील सहा गणपतीचे विसर्जन

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एक गाव एक गणपती अंतर्गत चार गावातील व कांकाडी येथील दोन अशा सहा गणपतीचे नऊ दिवसांच्या गणपतीचे विधीवत पूजन व टाळ मृदंग जयघोषात, ढोलताशांच्या गजरात स्वागत करुन पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया या जयघोषात श्री गणरायाला निरोप देण्यात आला, यावेळी ग्रामस्थ,महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव सतरा गावात स्थापन करण्यात आले आहेत,त्या अनुषंगाने नऊ दिवसांच्या गणपती असलेल्या कांकाडी येथे 2 , सिध्दनाथ, भायेगाव, वांगी,टापरेचौक वाजेगाव एक अशा सहा गणपतीचे विसर्जन विधीवत करण्यात आले यावेळी महाआरती, महाप्रसाद व गावातुन टाळ मृदंग जयघोषात गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या घोषणा देत गणपती बाप्पाला गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढुन निरोप देण्यात आला. या...
Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

Nine-day Ganesha immersion : ढोल-ताशांच्या गजरात नऊ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

धार्मिक, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर येथील नव गणेश मंडळाच्या वतीने नऊ दिवस भाविक भक्तीभावाने आरती, पूजा-अर्चा, विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवसाचा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. नऊ दिवस गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. सकाळ-संध्याकाळ आरती, लहान बाल गोपाळांसाठी खुर्ची रेस, चमचा-गोटी स्पर्धा, तसेच महिलांसाठी भक्ती संगीतावर ढोल ताशाच्या तालावर नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आज ढोल-ताशांच्या गजरात, जयजयकाराच्या घोषणा देत आणि भक्तीभावाने भरलेल्या वातावरणात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस निरीक्षक मारोती मुढे, पोलीस उपनिरीक्षक फड, महिला पोलीस अधिकारी व पोलीस होमगार्ड यांचा विशेष बंदोबस्त तैनात होता....
error: Content is protected !!