Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Bodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

Bodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

नांदेड, धार्मिक
देगलूर (गंगाधर मठवाले) तेलंगणा–महाराष्ट्र सीमेवरील असलेल्या देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर गावात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा पारंपरिक बोडेम्मा सण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या गावातील महिलांचे नातेवाईक व पाहुणे तेलंगणामध्ये असल्याने, तेथील सर्वात मोठ्या महिला उत्सवाच्या धर्तीवर शहापूर येथेही हा सोहळा रंगतो. पितृ अमावास्ये नंतरच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी शिवारातून विविध प्रकारची फुले गोळा करून त्यांची सुंदर मांडणी केली. संध्याकाळी गल्लीबोळांमधील महिला एकत्र होऊन तेलुगू व मराठी गाण्यांच्या तालावर पारंपरिक पावले खेळून बोडेम्मा सण साजरा केला. शेवटी गावालगत असलेल्या तलावात फुलांचे विसर्जन करून सर्वांनी एकत्र भोजन केले. या सोहळ्याला सगेसोयरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. हा सण म्हणजे महिला मुलींसाठी आनंदाची पर्वणी होय....
Ganesh Mandal ; डीजेमुक्त गणेश विसर्जन करणाऱ्या चिदगिरी येथील गणेश मंडळाचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने सत्कार

Ganesh Mandal ; डीजेमुक्त गणेश विसर्जन करणाऱ्या चिदगिरी येथील गणेश मंडळाचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने सत्कार

नांदेड, धार्मिक
भोकर l पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन डीजेमुक्त व पारंपरिक वाद्य लावून शांततामय वातावरणामध्ये गणेश विसर्जन करणाऱ्या चिदगिरी येथील गणेश मंडळ व पदाधिकाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डी.आर.हाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार व पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव २०२५ मध्ये केलेल्या आव्हानास भोकर शहरासह ग्रामीण भागातील गणेश मंडळाने चांगला प्रतिसाद देऊन गणेशोत्सव मिरवणूक दिलेल्या वेळेत पारंपरिक वाद्यांसह डीजेमुक्त पध्दतीने पोलीसांच्या अटी व नियमांचे पालन करुन शांततामय वातावरणात गणेशोत्सव मिरवणूक काढून प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल प्रमानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये चिदगिरी येथील शिवशक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी अध्यक्ष शंतनू देशमुख, उपाध्यक्ष विराज देशमुख, ओम कल्याणकर, मनोज कदम, योगेश कदम,गौरव देशमुख सह आदी पदाधि...
Mahur Navratri Festival : उदे ग अंबे उदे च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ

Mahur Navratri Festival : उदे ग अंबे उदे च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ

धार्मिक, नांदेड
माहूर/नांदेड| महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता मातृतिर्थ तलावातील पवित्र जल आणून देवीचा अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पारंपरिक विधीवत घटस्थापना संपन्न झाली. घटस्थापनेच्या वेळी "उदे ग अंबे उदे" च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व महाआरती केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा संपन्न झाली. देवीला पिवळ्या पैठणी वस्त्र अलंकार अर्पण करून साजशृंगार करण्यात आला. घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढून परिसरातील परिवार देवतांची पूजा, नैवेद्य व आरती तसेच कुमारिका ...
Venkatesh Balaji Temple : वाढोण्याच्या व्यंकटेश बालाजी मंदिरात घटस्थापनेने ब्रम्होत्सव सुरु; विजयादशमीला होणार बुंदीच्या प्रसादाचे वितरण

Venkatesh Balaji Temple : वाढोण्याच्या व्यंकटेश बालाजी मंदिरात घटस्थापनेने ब्रम्होत्सव सुरु; विजयादशमीला होणार बुंदीच्या प्रसादाचे वितरण

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
  हिमायतनगर (अनिल मादसवार) येथील आठशे 10 हून अधिक वर्षापूर्वीच्या पुरातन कालीन भगवान व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्रम्होत्सावाला सुरुवात झाली असून, सकाळी 4 वाजता अभिषेक महापुजेणे घटस्थापना करण्यात आली, यां निमित्ताने शेकडो भाविक भक्तांनी बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शेकडो वर्षापूर्वीचे यादव कालीन भगवान व्यंकटेश बालाजीचे मंदिर हिमायतनगर (वाढोणा) शहरातील बजरंग चौकाच्या पश्चिम बाजूस आहे. त्यानंतरच्या काळात मंदिराची दुरुस्ती झाल्यामुळे सदर मंदिर पुरातन वाटत नसले तरी मंदिरातील मुर्त्या व बांधकामाच्या दगडावरून हेमाडपंती कलेची मांडणी दिसून येते. बालाजीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून, पूर्व - पश्चिम ३३ फुट ४ इंच लांबी, तर दक्षिण - उत्तर रुंदी २७ फुट ६ इंच आहे. मंदिराचे बांधकाम ४ फुट उंचीच्या जोत्यावर करण्यात आलेले असून, मंदिराच्या उभारणीत मोठ मोठ्या दगडांच्या शिळा लावलेल्या आहे...
Mata Kalinka temple : उदो… उदो…च्या गजरात माता कालिंका मंदिरात घटस्थापना

Mata Kalinka temple : उदो… उदो…च्या गजरात माता कालिंका मंदिरात घटस्थापना

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७, दिनांक २२ सप्टेंबर रोजी सोमवारी वाढोणा येथील माता कालिंका मंदिरात ‘उदो... उदो...’ च्या जयघोषात व भंडारा उधळणीच्या उत्साहात गोंधळाच्या गजरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने व अभिषेक-महापूजेने मंदिर परिसर दुमदुमून गेला. हिमायतनगर शहराची कुलस्वामिनी माता कालिंका देवीचे महत्त्व सर्वदूर पसरलेले आहे. नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरातील मूर्ती वाकाटक-चालुक्यकालीन आहे. दैत्यांचा संहार करून धर्माचे रक्षण करणाऱ्या महिषासुरमर्दिनीच्या रूपातील ही प्रतिमा शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धास्थानी विराजमान आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडलेल्या घटस्थापणा विधीप्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूजेचा मान स्वीकारला आणि देवीचे दर्शन घेत उपस्थितांना नवरात्री उत्सवाच्या...
Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

नांदेड, धार्मिक, लेख
हिमायतनगर (वाढोणा) तालुक्यातील वाढोणा हे छोटेसे गाव, परंतु येथे उभे असलेले कालिंका माता मंदिर भक्तांसाठी प्रचंड आकर्षणाचे केंद्र आहे. यावर्षी या मंदिराला स्थापनेची तब्बल ३४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे एक प्रमुख शक्तीपीठ मानले जाते. स्थापत्य आणि इतिहास वाढोण्याच्या उत्तरेस असलेल्या या मंदिराचा इतिहास चालुक्यकालीन वारशाशी जोडलेला आहे. हेमाडपंथी शैलीतील शिळांवरून मंदिराची प्राचीनता स्पष्ट होते. सन १६७९ मध्ये कोळसेगिरी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली एका वडाच्या झाडाखाली दडलेली अष्टभुजाधारी काळ्या पाषाणातील मूर्ती शोधून काढली. गावकऱ्यांनी हेमाडपंथी मंदिर उभारून तिची प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून हे ठिकाण ‘कालिंका माता मंदिर’ म्हणून प्रसिद्ध झाले. मूर्तीचे वैशिष्ट्य पाच फूट तीन इंच उंच व तीन फूट रुंद अशी ...
Mata Kalinka temple : वाढोणा येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंकादेवी मंदिरात सोमवार पासून नवरात्रोत्सवाची धूम

Mata Kalinka temple : वाढोणा येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंकादेवी मंदिरात सोमवार पासून नवरात्रोत्सवाची धूम

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) वाढोणा शहराची कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा दि.22 सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाची धूम सुरु होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात तमाम महिला, पुरुष भाविक भक्तांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी. असे आवाहन मंदिर कमेटीच्या वतीने नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७ दि.२२ सोमवारी माता कालिंका देवीचा महाभिषेक व अलंकार सोहळा व घटनस्थपणा सकाळी ०९.०१ ते ११.३० वाजेच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. तसेच दररोज रात्री ७ ते ८ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे. तसेच दिनांक २३ पासून सात दिवस दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान संगीतमय देवी भागवत ...
Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ

Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ

Blog, धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता. कंधार येथील महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमवत केदार वैराग्य पिठाधीश्वर श्री. श्री. श्री. १००८ जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी ( शिवाचार्य रत्न श्री. ष. ब्र. प्र. षडक्षर शिवाचार्य महाराज शिराढोणकर ) , यांच्या सान्निध्यात दि. २२ सप्टेंबर २०२५ ते दोन ऑक्टोबर दरम्यान श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव निमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव काळात दररोज शिवपाठ दुर्गा सप्तसती पायायण , रेणुकविजय पुराण अखंड भगवत्राम सप्ताह रात्री ८ ते ११ , किर्तन व भजन , आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. १ ऑक्टोबर रोजी बुधवारी सायंकाळी सात ते दहा महाप्रसाद , रात्री दहा ते एक वाजता दरम्यान गावाती...
Vakritunda Ganesh Mandal of Usmannagar ; डीजे मुक्त गणेशोत्सव उस्माननगरच्या वकृतुंड गणेश मंडळाचा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून गौरव

Vakritunda Ganesh Mandal of Usmannagar ; डीजे मुक्त गणेशोत्सव उस्माननगरच्या वकृतुंड गणेश मंडळाचा अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडून गौरव

धार्मिक, नांदेड
उस्माननगर l सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण पुरकतेचा संदेश देत श्री गणेश उत्सव २०२५ मिरवणुकीमध्ये डीजे मुक्त , डाॅल्बी, कर्कश आवाजाचा वापर न करता पर्यावरण पुरक मुक्त मिरवणूक काढल्या बध्दल उस्माननगर ( मोठी लाठी ) ता. कंधार येथील वक्रतुंड गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डीजे मुक्त असा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस दल व नांदेड जिल्हा पोलीसांच्या आणि उस्माननगर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्सव शांततेत काढल्याबद्दल नांदेड जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उस्माननगर येथील वक्रतुंड गणेश मंडळांचे नांदेड जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. उस्माननगर ये...
Ganpati visarjan : श्री परमेश्वर मंदिर के मान के पूज्य गणपति का धूमधाम से विसर्जन

Ganpati visarjan : श्री परमेश्वर मंदिर के मान के पूज्य गणपति का धूमधाम से विसर्जन

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| ग्यारह दिनों तक श्रद्धा और भक्ति के साथ पूजा -अर्चना करने के बाद श्री परमेश्वर मंदिर के मान के प्रथम पूज्य गणपति बप्पा का विसर्जन भव्य शोभायात्रा के साथ किया गया। ढोल-ताशों, ताल-मृदंग की गूंज और जयकारों के बीच विसर्जन शोभा यात्रा निकाली गई। शहर के उमरखेड रोड पर स्थित श्री कनकेश्वर तालाब परिसर के वरद विनायक मंदिर के पास निर्मित्त कुएं में पूज्य गणपति बप्पा का विसर्जन संपन्न हुआ। इससे पूर्व सौ. सुचिता आदेश श्रीश्रीमाल के हाथो गणपति बप्पा की महाआरती संपन्न हुई। इस अवसर पर मंदिर समिति के उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाल, सचिव अनंता देवकते, सभी संचालक मंडली, महिला एवं पुरुष भजनी मंडलियों सहित बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित रहे।...
error: Content is protected !!