Monday, May 18

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Sreejaya Chavan ; आ. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘नांदेडची नवदुर्गा’ सन्मान वितरित

Sreejaya Chavan ; आ. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘नांदेडची नवदुर्गा’ सन्मान वितरित

नांदेड, धार्मिक
नांदेड l आ. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थानिक शिवाजीनगरस्थित श्री नवयुवक दुर्गामाता मंडळात जिल्ह्यातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नांदेडची नवदुर्गा’ म्हणून सन्मानित करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात नवरात्रीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील एका महिलेचा दररोज सत्कार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नांदेडच्या आई पराठा सेंटरच्या संचालिका भारती बडूरे, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील चालक व कर्मचारी संघटनेच्या नेत्या पद्मश्री राजे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डहाळे, यशस्वी विमा सल्लागार अरुणा कल्याणकर, एका खाजगी रुग्णालयात मदतनीस म्हणून कार्यरत अरुणा थोरात, नांदेड-मुंबई पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या सहचालक तेजश्री हंकारे, प्रभू डेरीच्या संस्थापिका चंद्रकला आल्लमखाने, भोकरच्य...
Shri Durgamata Run : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिमायतनगरात श्री दुर्गामाता दौड

Shri Durgamata Run : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त हिमायतनगरात श्री दुर्गामाता दौड

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौड कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या दुर्गामाता दौडीचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य जनतेच्या मनात जागवणे तसेच देव–देश–धर्माची प्रेरणा युवकांमध्ये निर्माण करणे हा आहे. ही दौड घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज सकाळी ५.३० वाजता कालिंका मंदिरापासून सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्याने निघून पुन्हा मंदिर परिसरात सांगता होत आहे. या वेळी सर्व शिवभक्त पांढरा कुर्ता-पायजमा, पांढरी टोपी व पदक घालून या दौड मध्ये सामील होतं असून शुभ्र वस्त्र बंधनकारक ठेवले आहे. कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होतं असून, आयोजकांनी शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात उपस्थित होऊन दुर्गामाता दौडी दररो...
Mahur’s Shri Renuka Devi Sansthan : अतिवृष्टी बाधितांसाठी माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाची एक कोटी एक लक्ष रुपयांची मदत – जिल्हाधिकारी कर्डिले

Mahur’s Shri Renuka Devi Sansthan : अतिवृष्टी बाधितांसाठी माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाची एक कोटी एक लक्ष रुपयांची मदत – जिल्हाधिकारी कर्डिले

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके,शेतजमिनी पाण्याखाली आले असून, काहींचा संसार हा उघड्यावर पडला (affected by heavy rains) आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अनेकांनी आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.  यावेळी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यातील संस्थाने पुढे आली आहेत. त्यातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान तर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटी एक लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधी निधीत जमा (Mahur's Shri Renuka Devi Sansthan provides Rs 1 crore and 1 lakh assistance) करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथील शासकिय विश्रामगुह येथे घेतलेल्या पत्रकार परीषे...
Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण

Manaji Patil Lonikar ; लोणीतील देवस्थानच्या जमिनीसाठी मानाजी पाटील लोणीकर यांचे आमरण उपोषण

धार्मिक, नांदेड
देगलूर l तालुक्यातील लोणी येथील श्री मारोती देवस्थानची १४ एकर जमीन परत देवस्थानाच्या नावे करण्यात यावी, अन्यायकारक फेरफार रद्द करावे, तसेच शासनाने योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख व लोणीचे उपसरपंच मानाजी पाटील लोणीकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे. मानाजी पाटील यांनी उपोषणादरम्यान सांगितले की, श्री मारोती देवस्थानची जमीन अनधिकृतरीत्या खरेदी-विक्री करून फेरफार करण्यात आले आहेत. हे फेरफार तातडीने रद्द करून जमीन पुन्हा देवस्थानाच्या नावे वर्ग ३ मध्ये नोंदविण्यात यावी. लोणी मंडळ अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून जमीन शासन व मंदिर संस्थेच्या ताब्यात द्यावी. याशिवाय, देवस्थानच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाची व आजवर मिळालेल्या उत्पन्नाची मावेना वसुली करण्यात यावी, तसेच जमिनीवर उचललेले बँकेचे कर्ज वसूल करण्यात यावे, अ...
Mahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड

Mahur News : भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य – पोलीस निरीक्षक गणेश कराड

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | माहूर गडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त लावला असून, आतापर्यंत एकही अपघात, पाकीटमारी किंवा छेडछाडीची घटना न घडल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नियोजनाचे कौतुक होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गडावर श्री रेणुका मातेसह विविध देवस्थानांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. गडावर सुरू असलेल्या लिफ्ट व स्कायवॉकच्या कामामुळे दर्शन पायऱ्यांवर दुहेरी ऐवजी एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. भाविकांना परतीसाठी परशुराम मंदिराच्या मार्गाने नवीन पायऱ्या तयार करून देण्यात आल्या असून, ही कामगिरी केवळ दोन दिवसांत पूर्ण केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. के. भिसे यांचे कौतुक होत आहे. पायऱ्यांवर प्रत्येक काही अंतरावर पो...
Swami Samarth : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कडून लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय

Swami Samarth : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ कडून लाखो भाविकांसाठी महाप्रसादाची सोय

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून लाखो भाविकांचा मोठा ओघ येत आहे. भाविकांच्या या गर्दीत कोणालाही उपाशी जावे लागू नये, यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे भोसीकर आणि एकलारे परिवारासह स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या लाखो भाविकासाठी अन्नदान सेवा सुरू करण्यात आली आहे. मंडळाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली अखंड नऊ दिवस अन्नदान सेवा सुरू असून भाविकांना प्रसादाचा लाभ मिळणार आहे. भाविकांसाठी रुचकर व पौष्टिक प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, दरवर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मागील पाच वर्षांपासून अन्नछत्र मंडळाची सेवा अविरतपणे सुरू आहे. सामान्य दिवसांमध्ये दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येतो, तर ...
Shri Balaji Charitable Trust ; श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा 15 वा दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम

Shri Balaji Charitable Trust ; श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा 15 वा दसरा ब्रम्होत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा वतीने 15 व्या ब्रम्होत्सव निमित्ताने 22सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होत्सव सेवा,भजन संध्या, बालाजी पालखी परिक्रमा,यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले असून 28 सप्टेंबर रोजी समर्थ किल्लनिक यांच्या तर्फे वैद्यकिय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे,विजया दशमी निमित्ताने 02 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान बालाजी मंदिरात ब्रम्होत्सव निमित्ताने 22ते 2ऑक्टोंबर 25 दरम्यान श्री गणेश पुजा, अभिषेक ध्वजाहोरण,होम हवन, आरती विष्णु सहस्त्र नाम, कुमकुमअर्चना आदी नित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दैनंदिन पालखी उत्सव परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. मार्कण्डेय भजनी मंडळ रात्री 8ते 10, तर 26 रोजी श्री नृसिंह मंडळ बसवेश्वर नगर,26रोजी ...
Shri Satyaai Devi Navratri ; दर तीन वर्षांनी साजरा होणाऱ्या श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथे उत्साहात सुरूवात

Shri Satyaai Devi Navratri ; दर तीन वर्षांनी साजरा होणाऱ्या श्री सत्यआई देवी नवरात्र महोत्सव काकांडी येथे उत्साहात सुरूवात

नांदेड, धार्मिक
नांदेड l तालुक्यातील पंचक्रोशीतील नवसाला पावणारी खव्याती असलेल्या श्री सत्याआई देवी नवरात्र महोत्सव कांकाडी ता,जि. नांदेड 22 सप्टेंबर पासून सुरू वात झाली असुन दैनंदिन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना,श्री सत्याआई देवीचे विधीवत पूजन 1 ऑक्टोबर होमहवण,2 रोजी देवीची पालखी व दैनंदिन पुरणपोळीचे नैवैद्य आयोजित करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील नवसाला पावणारी देवी खाव्याती असलेल्या काकांडी येथील जागृत देवी श्री सत्यआई देवी पुढे पूर्वी शेकडो बकऱ्यांचा बळी जायचा. पशुहत्येची प्रथा श्री संत तनपुरे महाराज पंढरपुरकर यांनी बंद करून देवीला पुरण पोळीचा नैवद्य सुरु केला व गावकऱ्यांना तुळशीमाळा घालून पशुहत्येपासून मुक्त केले. पुढे ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिध्दीस आली. आजही प्राचीन काळापसून श्री सत्यआई देवीची यात्रा दर तीन वर्षानी भरते,परिसर...
Mahur Renuka Navratrotsav : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र

Mahur Renuka Navratrotsav : श्री रेणूकादेवी साठी दहा पैठणी महावस्त्र नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात दहारंगी महावस्त्र

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास सोमवार दि,२२ सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. श्री रेणूकामातेला दहा दिवस वेगवेगळ्या रंगाच्या पैठणी महावस्त्र नेसविण्यात येणार आहे अशी माहिती श्री रेणूकादेवी संस्थानचे विश्वस्थ चंद्रकांत भोपी ,संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी,यांनी दिली आहे.श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांसाठी पर्वनीच असतो. दहा दिवस सह्याद्रीच्या डोंगररांगात आई भवाणी श्री रेणूकादेवीचा गजर ऐकावयास मिळतो. जिकडे- तिकडे भक्तीमय वातावरण पहावयास मिळते. नवरात्र उत्सवाची श्री रेणूकादेवी संस्थान विश्वस्थ समितीने जय्यत तयारी केली आहे. भाविकांना केंद्रबिंदु मानुन सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहीती पद्दसिध्द कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यानी दिली आहे. ...
Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना

Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना

नांदेड, धार्मिक, लेख
प्रस्तावना - आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे  सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।। श्लोकाचा  अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष (टीप) हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो. भक्तांच्या  हाकेला  धावून येणारी  देवी !-  सर्वस्वरूपी, विश्वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यान...
error: Content is protected !!