HomeनांदेडBodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

Bodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

देगलूर (गंगाधर मठवाले) तेलंगणा–महाराष्ट्र सीमेवरील असलेल्या देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर गावात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचा पारंपरिक बोडेम्मा सण उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या गावातील महिलांचे नातेवाईक व पाहुणे तेलंगणामध्ये असल्याने, तेथील सर्वात मोठ्या महिला उत्सवाच्या धर्तीवर शहापूर येथेही हा सोहळा रंगतो. पितृ अमावास्ये नंतरच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी शिवारातून विविध प्रकारची फुले गोळा करून त्यांची सुंदर मांडणी केली.

IMG 20250923 WA0007 Bodemma Festival : देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर येथे बोडेम्मा सण उत्साहात साजरा

संध्याकाळी गल्लीबोळांमधील महिला एकत्र होऊन तेलुगू व मराठी गाण्यांच्या तालावर पारंपरिक पावले खेळून बोडेम्मा सण साजरा केला. शेवटी गावालगत असलेल्या तलावात फुलांचे विसर्जन करून सर्वांनी एकत्र भोजन केले. या सोहळ्याला सगेसोयरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. हा सण म्हणजे महिला मुलींसाठी आनंदाची पर्वणी होय.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments